spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘Punha Ekda Sade Made Teen’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ, नवीन कलाकार येणार भेटीस…

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले.

काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे कुरळे ब्रदर्स धमाका करायला येणार आहेत. १७ वर्षांपूर्वी रतन, मदन आणि चंदन या कुरळे ब्रदर्सच्या तिकडीने सगळ्यांचीच मनं जिंकली होती. अभिनेते अशोक सराफ यांनी रतनची भूमिका साकारली होती. तर अभिनेते मकरंद अनासपुरे मदन आणि भरत जाधव चंदनच्या भूमिकेत झळकले होते. आता हेच त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झालं आहे. अर्थात ‘साडे माडे ३’ चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. आज चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्यासह कोण झळकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. हे सरप्राईजही आता समोर आले असून यात सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि संकेत पाठकही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील ही तगडी स्टारकास्ट पाहाता हा सिनेमा पुन्हा एकदा बॅाक्स ॲाफिस गाजवणार, हे नक्की ! या चित्रपटाचा मुहूर्त पार पडल्यानिमित्ताने सिद्धार्थ जाधवने खास पोस्ट शेअर केली आहे.सिद्धार्थने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चित्रपटाच्या टीमबरोबर अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि संकेत पाठक दिसत आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “‘पुन्हा एकदा साडे माडे ३’…’पुन्हा एकदा’ महाराष्ट्रातल्या मेगा सुपरस्टार्सबरोबर काम करायचा योग…अशोक सराफ सर, मकरंद अनासपुरे सर, भरत जाधव सर…’पुन्हा एकदा’

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, ” आज बाप्पाच्या आशीर्वाद घेऊन आम्ही फ्लोअरवर उतरत आहोत. यात अमेय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते, ओंकार माने यांची साथ लाभल्याने हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बनेल, याची खात्री आहे. चित्रपटातील कलाकार तर कमाल आहेतच. यात काही नवीन कलाकार या कुरळे ब्रदर्सच्या कुटुंबात सहभागी झाल्याने ही धमाल आता आणखी वाढणार आहे. आता नवीन जोमाने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ.’’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss