spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुष्कर जोग अनुषा दांडेकर आगामी ‘ बाप माणूस ‘चित्रपटाची फ्रेश जोडी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुष्कर जोगच्या व्हिक्टरीया, वेल डन बेबी आणि ती अँड ती नंतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंटच्या सोबतीने बापमाणूस हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

बिग बॉस सिझन १ फेम पुष्कर जोग लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘बाप माणूस’ असे असून याचे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. पुष्कर जोग व्हिक्टोरीया, वेल डन बेबी आणि ती अँड ती नंतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंटच्या सोबतीने बाप माणूस हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांच्या निर्मिती संस्थां अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट एकत्रित निर्मित करत असलेला हा चौथा चित्रपट असणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा या दोन्ही निर्मिती संस्थांनी केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच लंडनमध्ये सुरु होणार आहे.

बाप माणूसमधील कलाकारांबाबत बोलायचं झालं आलं तर, या चित्रपटाच्या माध्यमातून पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर यांच्यासह कुशल बद्रिके, शुभांगी गोखले आणि बाल कलाकार कीया इंगळे हे देखील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

बाप माणूस या चित्रपटाची आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट एकत्रित निर्मिती करत असून आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाल शाह, राहुल व्ही दुबे हे चित्रपटाचे सह निर्माते आहेत. दिग्दर्शन योगेश फुलपगार हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत .

कोण आहे अनुषा दांडेकर?

या महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे. पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. अनुषा बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटात काम करणार आहे.अनुषा दांडेकर ही एक ऑस्ट्रेलियन-भारतीय अभिनेत्री, गायिका आणि VJ किंवा व्हिडिओ जॉकी आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या या अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात भारतात केली.

चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, अनुषाने टीव्ही जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे, फॅशन आयकॉन दांडेकरने कॉस्मोपॉलिटन, एले आणि सेव्हेंटीनच्या मुखपृष्ठावर देखील काम केले आहे. रीबॉक, टोनी अँड गाय आणि ली जीन्स या ब्रँडच्या जाहिरातींमध्येही ती दिसली आहे. २०२१मध्ये, सलमान खानच्या शो बिग बॉस १५ मध्ये स्पर्धक वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सुद्धा ती दिसली होती.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi 4  : मराठी बिग बॉसच्या घरात मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाची हवा, महेश मांजरेकरांचं मोठे वक्तव्य

आदिपुरुष मेगा टीझर रिव्हल’च्या आधी चाहत्यांची उत्सुकतेमुळे ट्विटरवर विनोदी मिम्स होतायत ट्रेंड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss