spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कर्मचाऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अन्यथा…, केलेल्या पोस्टमुळे पुष्करला करावा लागतोय निषेधाचा सामना

मराठी बिग बॉसमधून घराघरात पोहचलला अभिनेता पुष्कर जोग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.पुष्कर सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो.

मराठी बिग बॉसमधून घराघरात पोहचलला अभिनेता पुष्कर जोग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.पुष्कर सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो.सध्या त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे त्याला अडचणीना सामोर जावं लागत आहे. पुष्करला  मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्याबद्दल केलेल्या पोस्टमुळे निषेधाचा सामना करावा लागतो आहे. म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी पुष्करचा जाहीर निषेध केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांना पत्र लिहित पुष्करविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय त्याने माफी मागितली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

बने यांनी पुष्करच्या वर्तनाचा निषेध करत असे म्हटले की, “जाहीर निषेध! कर्तव्याचे पालन करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल केलेल्या निंदनीय वक्तव्याबद्दल पुष्कर जोग यांचा जाहीर निषेध! श्री.जोग यांनी महापालिका कर्मचाऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अन्यथा आंदोलन अटळ! या बाबत उचित कारवाई करण्याची मान. मुख्यमंत्री आणि मान.महापालिका आयुक्त याना पत्राद्वारे विनंती. हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है.”अशा पद्धतीने बने यांनी पोस्ट शेअर केली आहे.


पुष्करने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत जातीसंदर्भात सर्व्हे करण्यासाठी आलेल्या बीएमसी कर्मचाऱ्याबाबत संताप व्यक्त केला होता. त्याने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे लिहिले की, ‘काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या… कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील.’ या पोस्टमध्ये त्याने #जोगबोलणार असा हॅशटॅगही वापरला होता.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेनेही याच प्रकरणात बीएमसीच्या महिल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर केला होता.केतकीने देखील व्हिडिओ शेअर करत यावर भाष्य केलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर हा वाद चांगलाच चर्चेत आला आहे.


पुष्कर सध्या त्याच्या ‘मुसाफिरा’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन पुष्करने केले असून येत्या २ फेब्रुवारीला ‘मुसाफिरा’ प्रदर्शित होतोय. या सिनेमात पुष्कर, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी आणि पुष्कराज चिरपुटकर मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत.

हे ही वाचा:

केंद्रीय अर्थसंकल्पाचे नियोजन कसे केले जाते,पैसा कसा खर्च होतो

२०२४ च्या अर्थसंकल्पात करदात्यांना सवलत मिळणार का? कर वाढण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss