प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! जाणून घेऊया ‘व्हिक्टोरिया’ चे रहस्य ..

यावर्षी १६ डिसेंबर पासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! जाणून घेऊया ‘व्हिक्टोरिया’ चे रहस्य ..

अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत इतर चित्रपटसृष्टींप्रमाणे नवनवे प्रयोग करून पहिले जात आहेत. ऐतिहासिक, हॉरर, थ्रिलर अशा विविध प्रकारच्या जॉनरचे सिनेमे मराठी सिनेसृष्टीत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित केले जात आहेत. असाच एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांचा गूजबम्प्स एंटरटेनमेंट निर्मित ‘व्हिक्टोरिया एक रहस्य’ हा सिनेमा या वर्षाच्या शेवटापर्यंत प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांचा आगामी मराठी चित्रपट ‘ व्हिक्टोरिया ‘ जाहीर झाल्यापासून ट्रेंडमध्ये आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत तर अभिनेत्री हिरा सोहल पदार्पण करत आहे. ‘व्हिक्टोरिया’चे दिग्दर्शन नवोदित जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी करणार आहेत.

ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत .पुष्कर जोग , सोनाली कुलकर्णी व आशय कुलकर्णी यांची प्रमुख भमिका असलेल्या ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग स्कॉटलंड मध्ये झालेले आहे . या चित्रपटाच्या माध्यमातून जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत .

तसेच अभिनेता पुष्कर जोग यांचा सोनाली कुलकर्णी सह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत. ‘व्हिक्टोरिया’ची कथा, पटकथा आणि संवाद ओंकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि पुष्कर जोग यांचा गूजबम्प्स एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे निर्मित केलेला हा तिसरा मराठी चित्रपट आहे. यावर्षी १६ डिसेंबर पासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

बिग बॉस १६ च्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

नितीन गडकरींनी ट्विट केलेल्या अक्षय कुमारच्या जाहिरातीने “हुंडाबळीला प्रोत्साहन” दिल्यामुळे विरोधकांनी केला टीकांचा भडीमार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version