Pushpa 2: बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर

‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘पुष्पा- द रूल’ या सीक्वेलचं शूटिंग रविवारपासून सुरू झालं. या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर मिरोस्लॉ कुबा ब्रोझेक याने इन्स्टाग्रामवर सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे.

Pushpa 2: बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’मधील अल्लू अर्जुनचा खास लूक आला समोर

‘स्टायलिश स्टार’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘पुष्पा- द रूल’ या सीक्वेलचं शूटिंग रविवारपासून सुरू झालं. या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर मिरोस्लॉ कुबा ब्रोझेक याने इन्स्टाग्रामवर सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पहायला मिळतोय. ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्याच्या सीक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘साहसाची सुरुवात झाली आहे. आयकॉन स्टारचे आभार’, असं कॅप्शन देत त्याने अल्लू अर्जुनचा फोटो पोस्ट केला आहे. निर्मात्यांना डिसेंबर २०२२ मध्ये हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता. त्यामुळे त्याची शूटिंग खूप आधीच सुरू होणार होती. मात्र काही कारणास्तव शूटिंगचं शेड्युल पुढे ढकललं गेलं. अल्लू अर्जुनच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘या आठ महिन्यांची प्रतीक्षा सकारात्मक ठरणार. फर्स्ट लूक पोस्टर पाहण्याची खूप उत्सुकता आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘आणखी एका अविस्मरणीय अनुभवासाठी सज्ज आहोत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ष्पा- द राईज या चित्रपटाने जगभरात तब्बल ३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर हिंदी डबिंग व्हर्जनने १०० कोटींहून जास्त कमाई केली.

हे ही वाचा :

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ; राज्य सरकार विरोधात निदर्शनं

NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेस संतप्त होऊन, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न

NCP : राष्ट्रवादी युवक काँग्रेस संतप्त होऊन, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा केला प्रयत्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version