Pushpa 2 (The Rule) : चाहत्यांची प्रतीक्षा संपली; जाहीर झाली ‘पुष्पा २’ चित्रपटाची पोस्टरसह रिलीज डेट…

Pushpa 2 (The Rule) : चाहत्यांची प्रतीक्षा संपली; जाहीर झाली ‘पुष्पा २’ चित्रपटाची पोस्टरसह रिलीज डेट…

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदन्ना (Rashmika Mandanna) हे दोघंही सर्वांचे आवडते कलाकार असल्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावरच घेतला. त्यामुळे हा चित्रपट कमाईमध्ये रेकॉर्ड तोडणारा ठरला. परंतु पुष्पाच्या यशानंतर प्रेक्षक ‘पुष्पा २’ साठी अतिशय उत्सुक आहेत. परंतु बऱ्याच प्रतिक्षेनंतर चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. ‘पुष्पा २’ ची रिलीस डेट पोस्टरसह घोषित झाली आहे.

काय आहे ‘पुष्पा २’ चित्रपटाची रिलीस डेट ?
‘पुष्पा २’ (Pushpa 2 The Rule) चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. परंतु निर्मात्यांनी पोस्ट प्रोडक्शनसाठी (Post Production), याची प्रदर्शित केली जाणारी तारीख घोषित करण्यात आली नव्हती. ‘अंगारो सा’ (Angaaron Sa) हे गाणं सुद्धा पोस्ट प्रोडक्शन काम बाकी असल्यामुळे लिरिकल पद्धतीतच प्रदर्शित झाले होते. परंतु आता निर्मात्यांनी पोस्टर सोबतच रिलीस डेटही घोषित केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या पोस्टरसह रिलीज डेट देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रदर्शित केलेल्या सोशल मीडिया पोस्टनुसार (Pushpa2 The Rule) हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांत सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.

Pushpa 2 The Rule ची स्टार कास्ट:
पुष्पा: द राइज (Pushpa : The Rise) यशानंतर आता ‘पुष्पा २’ सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित ‘पुष्पा २’ चित्रपटात पुन्हा एकदा अभिनेती रश्मिका मंदन्ना ‘श्रीवल्ली’ आणि अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ च्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे आता केवळ १०० दिवसांचा कालावधी उरला आहे.

हे ही वाचा:

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version