ॲनिमल थीम पार्टीत आलिया भट्ट सोबत झळकली राहा, अनंत अंबानींने केला प्रेमाचा वर्षाव… व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

तीन दिवसीय सोहळ्यात जामनगरमध्ये देश-विदेशातील बड्या व्यक्तींसह बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सची जणू जत्राच भरली असल्याचे चित्र दिसत आहे. अश्यातच या सोहळ्यात आलिया भट्ट आणि तिची मुलगी राहा देखील झळकल्या आहेत.

ॲनिमल थीम पार्टीत आलिया भट्ट सोबत झळकली राहा, अनंत अंबानींने केला प्रेमाचा वर्षाव… व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Party : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांची प्री-वेडिंग फंक्शन्स जोरात सुरू आहेत. हे फंक्शन्स गुजरातमधील जामनगरमध्ये १ मार्चपासून सुरू झाले आहेत. या तीन दिवसीय सोहळ्यात जामनगरमध्ये देश-विदेशातील बड्या व्यक्तींसह बॉलिवूड आणि हॉलिवूड स्टार्सची जणू जत्राच भरली असल्याचे चित्र दिसत आहे. अश्यातच या सोहळ्यात आलिया भट्ट आणि तिची मुलगी राहा देखील झळकल्या आहेत.

या प्री-वेडिंग सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. रणबीर आणि आलियाची प्रेयसी राहाचा एक व्हिडिओही सर्वांची मने जिंकत आहे. रणबीर कपूर आणि आलियाची मुलगी राहा यांना पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाले होते. दीड वर्षांची राहा अल्पावधीतच बी-टाऊनच्या लोकप्रिय स्टार किड्सच्या यादीत सामील झाली आहे. राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही वाट पाहत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी बॉलिवूड जगतातील स्टार्स जामनगरला पोहोचले आहेत. राहा तिच्या आई आणि वडिलांसोबत राधिका आणि अनंतच्या प्री-वेडिंग फंक्शनलाही गेली होती. नुकताच या सोहळ्यातील राहाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट राहाला घेऊन येताना दिसत आहे. ज्यामध्ये नवरा मुलगा म्हणजे अनंत अंबानी राहासोबत बोलताना दिसत आहे. अनंत हा राहाचा हात पकडून तिला मिठी मारताना दिसत आहे. अनंत आणि राहा यांच्यातील हे बाँडिंग पाहून प्रत्येकजण या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगच्या दुसऱ्या दिवशी ॲनिमल थीम पार्टी होती. या पार्टीत सर्व सेलिब्रिटींनी ॲनिमल थीमचे ड्रेस परिधान केले होते. आईसोबत राहाही प्राण्यांच्या थीमच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती. राहा दोन वेण्यांमध्ये खूप गोंडस दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते अनंत आणि राहा यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग बॅशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्री-वेडिंग सेरेमनीच्या दुसऱ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका मेहता आणि मुलगी ईशा अंबानी यांचे लूकही चर्चेत होते.

हे ही वाचा:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे CM Eknath Shinde यांनी घेतले दर्शन

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version