Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे-राज ठाकरे अन् ‘वीर दौडले सात’!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे.

Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे-राज ठाकरे अन् ‘वीर दौडले सात’!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाचे चित्र सातत्यानं बदलता दिसत आहे. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चेला उधाणही आले आहे. त्यात राज आणि शिंदे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Directed by Mahesh Manjrekar) यांच्या वीर दौडले सात या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा हा आज पार पडणार आहे. त्याला राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. सध्या राज्यातील एकापाठोपाठ एक महत्वाचे प्रकल्प वेगळ्या राज्यांमध्ये जात आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरले आहे. त्यातच राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले होते.

वीर दौडले सातच्या मुहूर्त सोहळ्याच्या निमित्तानं राज पुन्हा काय बोलणार अशी चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी घेतलेल्या हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्तानं घेतलेल्या मुलाखतीमधून राज यांनी चौफेर फटकेबाजी केली होती. त्यानंतर ते पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा:

Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल… टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!

तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या, तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे… ; नितीश राणे

वेदांता प्रकल्पाबाबत RTI अंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची असल्याचे ठाकरे गटाचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version