राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; नेमकं कारण काय?

'येक नंबर' या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मुंबईतील वांद्रे येथील ताज हॉटेल येथे पार पडणार आहे. त्यासाठी सलमान खानला आमंत्रित करण्यासाठी स्वतः राज ठाकरे हे सलमानच्या घरी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; नेमकं कारण काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आधारित ‘येक नंबर’ (Yek Number) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच निमित्ताने राज ठाकरे हे सलमान खान (Salman Khan)च्या मुंबईतील वांद्रे (Bandra) येथील निवासस्थानी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये भेटीला गेले. उद्या (दि. २५ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी ‘येक नंबर’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा मुंबईतील वांद्रे येथील ताज हॉटेल येथे पार पडणार आहे. त्यासाठी सलमान खानला आमंत्रित करण्यासाठी स्वतः राज ठाकरे हे सलमानच्या घरी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. लॉंच सोहळयाला अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, निर्माता साजिद नाडियाडवाला, अभिजित जोशी आणि राज ठाकरेसुद्धा उपस्थित असणार आहेत.

‘येक नंबर’ या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राज ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘येक नंबर’ हा सिनेमा येत्या १० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज ठाकरे यांचा हा बायोपिक तर नाही? या सिनेमाचा विषय नेमका काय असेल? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. प्रेक्षकांना पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यात मिळणार आहेत.

‘येक नंबर’ या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि वरदा साजिद नाडियाडवाला (Warda Sajid Nadiadwala) आहेत. तर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे अजय- अतुल (Ajay-Atul) यांनी धमाकेदार संगीताची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे (Sanjay Memane) यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया देताना तेजस्विनी पंडितने म्हटले की, ” चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. टीझरला मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. ‘येक नंबर’ या चित्रपटाची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे. अशा प्रकारचा प्रयत्न मराठीत यापूर्वी कधीही झाल्याचे मला आठवत नाही”.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: अग्रलेख तूच लिहिला होतास ना रे, आपले पाय कुठल्या शेणात…Naresh Mhaske यांचे राऊतांवर ताशेरे

Big Boss Marathi Season 5: घरातील सदस्यांचा १०० दिवसांचा प्रवास ७० दिवसातच संपणार; फिनालेची तारीख जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version