Gandhi-Godse चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींनी पोलिसांकडून मागितले संरक्षण, जीवाला धोका असल्याची दिली माहिती

गांधी गोडसे या चित्रपटामुळे जीवे मारून टाकण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मुंबई पोलिसांचे सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. '

Gandhi-Godse चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींनी पोलिसांकडून मागितले संरक्षण, जीवाला धोका असल्याची दिली माहिती

चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या जीवाला धोका असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांना पत्रही लिहिले आहे. गांधी गोडसे या चित्रपटामुळे जीवे मारून टाकण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मुंबई पोलिसांचे सीपी देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. ‘गांधी गोडसे – एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईतील विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहून स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे, कारण मुंबईतील आंदोलकांच्या एका गटाने त्यांनी आणि त्यांच्या टीमने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवर हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेत व्यत्यय आला. याशिवाय राजकुमार संतोषी आणि निर्माते यांनीही पोलिसांची भेट घेतली आहे.

पोलीस काय म्हणाले?

गांधी गोडसे चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि निर्माते ललित कुमार श्याम टेकचंदानी यांनी आज मुंबई पोलिसांचे सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांची भेट घेतली आणि दोघांनी चौधरी यांना निवेदन दिले आणि सततच्या धमक्यांमुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. गरजेनुसार कारवाई केली जाईल, असे चौधरी यांनी एबीपी न्यूजला सांगितले. चौधरी पुढे म्हणाले की, चित्रपट जेथे सेट होईल, तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त फौजफाटा तैनात केला जाईल.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच या चित्रपटालाअनेकांचा विरोध होत झाला होता. अलीकडेच राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटासंदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. परिषद सुरु असताना काही लोकांनी ‘गांधी जी अमर रहे’च्या घोषणा दिल्या आणि काळे झेंडेही दाखवले.

हे ही वाचा:

ICC ODI Rankingमध्ये मोहम्मद सिराजचा ‘राज’ सर्व खेळाडूंनी मागे ठरला नंबर १ गोलंदाज

#HarSawalUthega म्हणत प्रजासत्ताक दिनानिमित्त टाटा कंपनीने लहान मुलांसाठी नवी मोहीम घेतली हाती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version