spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Raju Srivastava : विनोदाचा बादशहा हरपला, राजू श्रीवास्तवबद्दल काही खास किस्से…

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

राजू श्रीवास्तव आले तेव्हा त्याच्या विनोदाची जणू एक लाटच आली होती. ते आले म्हणजे नकलांच्या (Mimicry) माध्यमांतून अँक्टिव्ह झाले होते. तेव्हाच्या काली यूट्यूब, टीव्ही, सीडी आणि डीव्हीडी असं काहीच नव्हतं. होती ती फक्त ऑडिओ कॅसेट. पेन्सिलने ती पुढे-मागे करता येत होती. जगात विनोदाचा बादशहा म्हणून ते गाजले. पण त्यांना पहिली प्रसिद्धी याच ऑडिओ कॅसेटने मिळवून दिली. नकलाकार, हास्य कलाकार राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava) याच्या सामान्य कलाकार ते विनोदाचा (Comedy) बादशहा इथपर्यंतच्या प्रवासातले किस्से खूप खास आहेत.

राजू श्रीवास्तवनेच त्या काळातील कॅसेटचं वर्णन केलं होतं. ‘ त्या काळी एवढे चॅनल नव्हते. फक्त दूरदर्शन होतं. मी त्या काळातला सामान्य माणूस. डीव्हीडी, सीडी काहीच नव्हतं… पेनड्राइव्हही नव्हता…. उस समय हमारे ऑडिओ कॅसेट रिलीज होते थे… जो बीच में फस भी जाते थे, उनमें पेंसिल डालकर ठीक करते थे.. टी सीरीज मे हमारा पहला कॅसेट आया था….

राजू श्रीवास्तवने एका कार्यक्रमातच हा किस्सा सांगितला होता. ‘मी एका रिक्षात बसलो होतो. त्यात माझीच कॅसेट लागली होती. पण ऐकणाऱ्याला मीच तो आहे, हे माहिती नव्हतं. मी म्हणालो, हे बंद करा, काय ऐकताय असलं? तेव्हा तो म्हणाला, अरे नही भैय्या… कोई श्रीवास्तव है, बहुत हँसाता है…

हे ही वाचा :  Raju Shrivastava : प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

राजू श्रीवास्तवने त्याच्या अतरंगी कपड्यांवरही खास स्पष्टीकरण दिलं होतं. तो म्हणाला होता, मी लखनौ-पटनासारख्या शहरांच्या जत्रांमध्ये शो करतो. तिथं खूप गर्दी असते. अशा अतरंगी कपड्यांमुळे लोक मला दुरूनच ओळखतात. लोकांनी चोटी कलाकार म्हणावं म्हणून मी चोटी ठेवलीय, असंही त्यानं सांगितलं होतं….

 मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले राजू श्रीवास्तव बॉलिवूड काम करण्यासाठी मुंबईला आले होते. मुंबईला आल्यावर त्यांचा प्रवास सोपा नव्हता, सुरवातीला त्यांना काम मिळत नव्हते तेव्हा पोटापाण्यासाठी रिक्षादेखील चालवली होती. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, यासारख्या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिका साकारायला होत्या. राजू श्रीवास्तव यांना लहानपणापासूनच नक्कल करण्याची आवड होती. पुढे द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमधून त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली. लोक त्याच्या विनोदांची लाट आली. त्याचे किस्से पाहता पाहता लोकप्रिय झाले.

हे ही वाचा:

Share Market : २०० अंकांनी सेन्सेक्स घसरला

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून मोदींचे कौतुक, म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी योग्य बोलले”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss