spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आईच्या निधनामुळे Rakhi Sawant वर कोसळला दुःखाचा डोंगर, कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरने होत्या ग्रस्त

राखी तिच्या आईच्या खूप जवळ होती आणि आता राखीच्या आईचे निधन झाल्यामुळे राखी पूर्णपणे तुटली आहे.

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री राखी सावंतची (Rakhi Sawant) आई जया यांचे काल शनिवारी रात्री निधन झाले. तिची आई ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त होती आणि गेले बरेच दिवस त्यांच्या या आजारावर उपचार सुरू होते. राखी तिच्या आईच्या खूप जवळ होती आणि आता राखीच्या आईचे निधन झाल्यामुळे राखी पूर्णपणे तुटली आहे. आईला रुग्णालयातून घेऊन जाताना राखी सावंतने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचीही (Salman Khan) आठवण काढली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

 राखी सावंतची आई जया यांचे २८ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. राखीच्या आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. राखी तिच्या आईवर मुंबईतील चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घेत होती. मात्र, आजाराशी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनामुळे राखीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. आईला रुग्णालयातून घेऊन जात असताना राखी ढसाढसा रडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान तिने सलमान खानची आठवण काढली आणि ‘सलमान भाई माँ मर गई’ असे देखील म्हटले आहे. यावेळी ती वारंवार सलमान खानचे (Salman Khan) नाव घेत होती.

राखी सावंतची आई गेल्या ३ वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. त्याचा उपचारही बराच काळ सुरू होता. मात्र, कालांतराने त्यांचा आजार वाढत गेला. कर्करोग किडनी आणि फुफ्फुसात पसरला होता. तिच्या आईचे अनेक अवयव निकामी झाले होते, त्यामुळे प्रकृती अधिक गंभीर झाली होती. राखीने सांगितले की, जानेवारीमध्ये तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याचे निदान झाले, त्यानंतर ती कोणाला ओळखूही शकली नाही. सलमान खानपासून ते मुकेश अंबानीपर्यंत (Mukesh Ambani) राखी सावंतच्या आईच्या उपचारात मदत केली.

हे ही वाचा:

केंद्रीय मंत्र्यांना स्वत:च्या खात्याचा अर्थ कळत नाही, विनायक राऊतांनी लगावला नारायण राणेंना टोला

जम्मूत गेल्या सहा महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन … सामनातून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss