spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मालिकेत होणार दया भाभी ची एंट्री

या मालिकेतील दया बेनची लोकप्रियता भरपूर आहे. गेल्या काही वर्षभरापासून दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेपासून दूर होती. मात्र आता या मालिकेत नव्या दया बेनची एन्ट्री होणार आहे.

प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय हिंदी विनोदी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  उत्तम कथानक, कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि मालिकेची योग्य पद्धतीने केलेली मांडणी यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातच मालिकेतील दया, जेठालाल, भिडे मास्तर, अय्यर, सोढी, चंपक चाचा ,टपू सेना आणि डॉ. हाथी या काही भूमिका विशेष गाजल्या. या मालिकेतील दया बेनची लोकप्रियता भरपूर आहे. गेल्या काही वर्षभरापासून दया बेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेपासून दूर होती.
मात्र आता या मालिकेत नव्या दया बेनची एन्ट्री होणार आहे. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण आता या शोमध्ये दयाबेनची धमाकेदार एंट्री होणार आहे. आता दिशा वकानी नसली तरी ‘हम पांच’ फेम अभिनेत्री राखी विजान दया बेनची भूमिका  साकारणार आहे. राखी विजान बऱ्याच दिवसांनी  मालिकेत पुनरागमन करणार आहे. दिशाच्या भूमिकेत राखीला पाहणे चाहते उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, “दयाबेनची भूमिका साकारण्यासाठी राखी विजानला संपर्क करण्यात आला आहे.
राखी ही गुणी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचं कॉमिक टाइमिंग चांगलं आहे. राखीने याआधी ‘हम पांच’, ‘देख भाई देख’, ‘बनेगी अपनी बात’, ‘नागिन 4’ सारख्या मालिकेत भूमिका साकारल्या आहेत. राखी ने ‘गोलमाल रिटर्न्‍स’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. अभिनेत्री राखी ‘बिग बॉस 2’ मध्येही सहभागी झाली होती.

Latest Posts

Don't Miss