रक्षाबंधन ठरणार अक्षय कुमारचा या वर्षातला ४ था फ्लॉप सिनेमा

रक्षाबंधनाच्या दिवाशी सिनेमा प्रदर्शित करूनदेखील प्रेक्षकांचा सिनेमाला फार कमी प्रतिसाद मिळाला.

रक्षाबंधन ठरणार अक्षय कुमारचा या वर्षातला ४ था फ्लॉप सिनेमा

रक्षाबंधन

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि ट्विटर बराच ट्रोल झालेला सिनेमा रक्षाबंधन अखेर गुरुवारी (११ ऑगस्ट) प्रदर्शित झाला. गुरुवारी बॉक्स ऑफिसवर रक्षाबंधन व्यतिरिक्त अजून एक सिनेमा प्रदर्शित झाला आणि तो सिनेमा म्हणजे आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा. हे दोन्ही सिनेमे एकत्र एकाचवेळी प्रदर्शित झाल्यामुळे या दोन्ही सिनेमांपैकी नक्की कोणता सिनेमा वरचढ ठरणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. ण आता काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. आमिर पाठोपाठ अक्षयच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

भावा – बहिणीच्या नात्यावर आधारित असणारा हा सिनेमा ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या दिवशी सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे सिनेमाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल असे अंदाज अनेकांकडून वर्तवण्यात येत होते. मात्र आश्चर्य म्हणजे या खूप प्रोमोशन करुन आणि ऐन रक्षाबंधनाच्या दिवाशी सिनेमा प्रदर्शित करूनदेखील प्रेक्षकांचा सिनेमाला फार कमी प्रतिसाद मिळाला. हिल्या दिवशी ‘रक्षाबंधन’ने फक्त ९ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ६ कोटी रुपये इतपत या चित्रपटाची कमाई होती.

सध्या येणाऱ्या सलग सुट्ट्यांमुळे कुठेतरी हे चित्र बदलेल आणि सिनेमाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल अशी चर्चा आता सुरु आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ६ ते ७ कोटींचा गल्ला जमावला. आतापर्यंत अक्षयच्या या बहुचर्चित चित्रपटाने २१.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमारने याआधी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्याचे आधीचे सिनेमे लक्षात घेतले तर, ‘रक्षाबंधन’ ने आतापर्यंत केलेली कमाई ही फारच कमी आहे.

‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ असे अक्षयचे एकापाठोपाठ एक तीन चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. त्याचा हा चौथा चित्रपटदेखील सुपरफ्लॉप ठरणार का? हे पाहणे आता महत्वाचे आहे. रक्षाबंधन आणि लाल सिंग चड्ढा हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱयात अडकले होते. आणि त्यानंतर आता या सिनेमांना प्रेक्षकांचा असा थंड प्रतिसाद मिळत आहे. तर सिनेमांचं होणारं ट्रॉलिंग आणि नेटकऱ्यांचा विरोध हि ह्या मागची कारणं असू शकतील का? अशा चर्चासुद्धा आता सुरु झाल्या आहेत.

हे ही वाचा:

दोस्तो का दोस्त विलासराव

Exit mobile version