spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुरांबा मालिकेत बरसणार प्रेमाचा पाऊस रमा – अक्षय मधलं नातं फुलणार

प्रेमाच्या या नात्याची गोड सुरुवात पावसाच्या हजेरीने होणार आहे. मुकादम कुटुंब पिकनिकसाठी निघालं आहे.

मुंबई: बेधुंद तू बेधुंद मी म्हणत रमा आणि अक्षय मधलं नातं बरसणाऱ्या पावसामुळे हळूहळू फुलणार आहे. बहरणाऱ्या दोघांमधल्या प्रेमाचा आंबट गोड मुरांबा (Muramba) आता मुरायला लागलाय. रमाच्या अवखळ आणि निरागस स्वभावाने अक्षयला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडलच. प्रेमाच्या या नात्याची गोड सुरुवात पावसाच्या हजेरीने होणार आहे. मुकादम कुटुंब पिकनिकसाठी निघालं आहे. पावसात पिकनिकचा आनंद काही औरच. अश्यातच पाऊस सुरु होतो आणि पावसात भिजण्याचा मोह रमाला काही आवरत नाही. अक्षयला पावसात भिजायला आवडत नाही. मात्र रमावरच्या प्रेमापोटी अक्षयही पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटणार आहे.
येत्या रविवारी म्हणजेच १० जुलैला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता हा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करत मुरांबा मालिकेच्या संपूर्ण टीमने या खास भागाचं शूटिंग पूर्ण केलं. अक्षय मुकादम ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शशांक केतकरसाठी (Shashank Ketkar) तर हा सीन खूपच स्पेशल आहे. कारण या सीनच्या निमित्ताने पावसात भिजण्याचा आनंद त्याला लुटता आला. पाऊस म्हटलं की वाफाळता चहा आणि गरमागरम भजी आलीच.
त्यामुळे संपूर्ण टीमने मिळून वाफाळता चहा आणि गरमागरम कांदाभजीचा आस्वाद घेतला. मुकादम कुटुंबाच्या पिकनिकचा हा सीन मढमधल्या एका खास लोकेशनवर करण्यात आला. शशांक केतकरला हे लोकेशन इतकं आवडलं की पुन्हा पुन्हा इथे सीन व्हावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली. त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने का होईना संपूर्ण मुकादक कुटुंबाने पिकनिकचा आनंद लुटला. तेव्हा हा महाएपिसोड रविवार १० जुलैला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Latest Posts

Don't Miss