spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रणबीर कपुर ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज,’या’ देशात होणार लंका दहन शूट

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी  'रामायण'या चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आहे.हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी  ‘रामायण’या चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आहे.हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची  घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमासाठी उस्तुक असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. लवकरच नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग मुंबईसह लंडनमध्ये होणार आहे. या सिनेमासाठी रणबीर कपूर आता सज्ज झाला आहे.रणबीरने या भूमिकेसाठी अनेक गोष्टींचा त्याग देखील केला आहे.

दरम्यान नितेश तिवारी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  रिपोर्टनुसार,चित्रपटाचे बरेचसे शूटिंग हे मुंबईत पहिले ६० दिवस होणार आहे. त्यानंतर लंडनमध्ये पुढील 60 दिवस ‘रामायण’चं शूटिंग चालेल. तसेच लंडनमध्येच या सिनेमातील लंका दहन सीन शूट होणार आहे. या सिनेमातील अॅक्शन सीनचं शूटिंग लंडनमधील एका स्टुडिओमध्ये होणार आहे. रणबीर कपूर या सिनेमात प्रभू रामाच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात रणबीर रामाच्या, तर साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.तसचं सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे.रिपोर्टनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओल खूप उत्सुक आहे. या सिनेमात विजय सेतुपतीची एन्ट्री होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तर रणबीरने  या भूमिकेसाठी दारू आणि मांसाहार सोडला,तर रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणे देखील बंद केलं आहे, असं म्हटलं जात आहे.

‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या घसघशीत यशानंतर आता रणबीरने ‘रामायण’ या चित्रपटासाठी कंबर कसली आहे.’रामायण’ हा सिनेमा मार्च 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बजेट सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.या सिनेमासंदर्भात नवनव्या अपडेट्स समोर येत आहेत. आता या सिनेमाच्या शूटिंगसंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.दरम्यान आता प्रेक्षक या भव्य दिव्य सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.दरम्यान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कितीचा गल्ला जमवणार हे पाहणं औस्तुकत्तेचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

गणपत गायकवाड मुद्यावरून राऊतांचा हल्लबोल, संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी

पूनम पांडेच्या विरोधात तक्रार दाखल,कॅन्सरविषया जनजागृती करत मृत्यूची खोटी बातमी देणं पडणार महागात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss