spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘रमशा फारुकी’ ठरली ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाची विजेती !

११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या ‘जाऊ बाई गावात’ ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘रमशा फारुकी’ महाविजेती ठरली.

११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या ‘जाऊ बाई गावात’ ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘रमशा फारुकी’ महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि जाऊ बाई गावातची मानाची ट्रॉफी देण्यात आली. मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या 3 महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, ‘रमशा फारुकी, ‘रसिक ढोबळे, ‘संस्कृती साळुंके’, ‘अंकिता मेस्त्री’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’ह्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली.हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन ह्यामुळे. अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेल्या ह्या कार्यक्रमाने सर्वांची मन जिंकली. ह्या कार्यक्रमाला खास पाहुणे लाभले होते ते म्हणजे आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर.

रमशा ने  आपला आनंद व्यक्त करताना सांगितले, ” Oh My God ! तो क्षण जेव्हा सरानी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली  विजेती आहे ‘रमशा’. तेव्हा मला वाटत  होतं की मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती.पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है”. खरच  बेस्ट मोमेन्ट आहे लाईफचा. मी स्वतःला हेच म्हणाली की ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं  ‘जाऊ बाई गावात’ ह्या शोला १०० % दिले आहे तसच पुढे ही दयायच आहे, कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही.

पुढे रमशा म्हणाली…माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली, थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही  केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकतं. ‘जाऊ बाई गावात’ आणि झी मराठीच्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानल आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवले आहे की मी गावात एक घर घेणार, मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे.”

हे ही वाचा: 

Ashok Chavan भाजपच्या वाटेवर? नॉट रिचेबल असल्याने…

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात  राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss