Ranbir Kapoor Birthday : रणबीर आणि कतरिनाचे परदेशातील खाजगी फोटो झाले व्हायरल, सोशल मीडियावर चर्चा

Ranbir Kapoor Birthday : रणबीर आणि कतरिनाचे परदेशातील खाजगी फोटो झाले व्हायरल, सोशल मीडियावर चर्चा

रणबीर कपूर आज त्याचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. रणबीरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. एकेकाळी त्यांचे आणि कतरिना कैफचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांमध्ये होते. खरं तर कतरिनाच्या आधी रणबीरचं अफेअर दीपिका पदुकोणसोबतही होतं. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरची कतरिनासोबतची जवळीक वाढली.

हे दोघेही एकेकाळी खूप गंभीर नात्यात होते आणि त्यांचे अफेअर जवळपास सहा वर्षे चालले. यादरम्यान कतरिना आणि रणबीरही (Ranbir Kapoor) बराच काळ लिविनमध्ये राहिले. मात्र, काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतरच त्यांचे ब्रेकअप झाले. आज रणबीर आणि कतरिनाच्‍या नात्यामध्‍ये एक खूप चर्चेत आली आहे. वास्तविक, रिलेशनशिप दरम्यान, कतरिना आणि रणबीर सुट्टीसाठी इबिझा येथे गेले होते. यादरम्यान त्यांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते, या घटनेने त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.

हेही वाचा : 

विकास काम ठरवून दिल्याप्रमाणे झाली नसल्याची तक्रार, बच्चू कडू संतापले आणि त्यांनी ……

फोटो लीक झाल्यानंतर कतरिनाने यावर प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, “फोटो व्हायरल झाले याबाबत मी नाराज आहे. मला थोडा एकांत हवा होता. माझ्या खासगी व्हॅकेशनचे फोटो काढण्याचा तुमचा काही प्लॅन असेल तर मला आधी सांगा. जेणेकरून मी मॅचिंग कपडे परिधान करेन. कारण पांढऱ्या व लाल रंगाची बिकनी मॅचिंग नाही हे मला माहित आहे. पुढच्यावेळी मी मॅचिंग कपडे परिधान करेन.” रणबीर-कतरिनाचे हे फोटो टॉक ऑफ द टाऊन ठरले होते.

Tata Tiago EV : कार खरेदी करण्याचा विचार करताय?, टाटानं लॉन्च केली देशातील स्वस्त इलेक्ट्रिक कार

त्याचवेळी, अभिनेत्रीचे खासगी क्षण अशा प्रकारे लीक झाल्याबद्दल संताप व्यक्त करत सलमान खान म्हणाला, ‘अशा प्रकारे कोणाचेही सार्वजनिक फोटो लीक करणे चुकीचे आहे. कल्पना करा जर कोणी तुमच्या आई, बहीण, पत्नी किंवा मैत्रिणीचे फोटो अशा प्रकारे लीक केले तर तुम्हाला कसे वाटेल? आम्ही तुम्हाला सांगतो की आज रणबीर आणि कतरिना दोघेही आपापल्या आयुष्यात सेटल झाले आहेत, जिथे कतरिनाने विकी कौशलसोबत लग्न केले आहे. त्याचवेळी रणबीरने आलिया भट्टसोबत लग्न केले असून ते दोघेही लवकरच आई-वडील होणार आहेत.

‘मी माझ्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही..’ सैफ अली खानचा या वक्तव्यानंतर करीन सोशल मीडिया ट्रोल

Exit mobile version