spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आई झाल्यानंतर आलियाचं करिअर कसं असेल याबाबत रणबीर ने सांगितले…

रणबीर एके ठिकाणी शमशेराच्या प्रमोशनकरिता पोहोचला तेव्हा त्याने आलिया बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्री आलिया भट्ट ने आपण आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यामुळे लग्नानंतर आलिया आणि रणबीर ही जोडी पुन्हा एकदा जास्त चर्चेत आहे. अनेकदा आलियाच्या प्रेगनेन्सी बद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असते. सध्या अभिनेता रणबीर कपूर शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. रणबीर जेव्हा एके ठिकाणी शमशेराच्या प्रमोशनकरिता पोहोचला तेव्हा त्याने आलिया बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रणबीरने सांगितलं की, आई झाल्यानंतर आलियाचं फिल्मी करिअर कसं असेल.
शमशेराच्या प्रमोशनवेळी एका मीडिया इंटरव्ह्यूमध्ये रणबीर कपूरने आलिया भट्टच्या करिअरबद्दल उघडपणे सांगितलं आहे. रणबीर म्हणाला की, “मी आणि आलिया आमच्या मुलांबद्दल खूप आनंदी आहोत”. लग्ना पूर्वीपासूनच आम्ही मुलाचं नियोजन सुरू केलं होतं. त्यावेळी आई झाल्यानंतर आलियाच्या अभिनय करिअरचा ही आम्ही विचार केला आहे. आलियाने काम थांबवावं किंवा त्यासाठी आपली स्वप्न बाजूला ठेवावी असं मला अजिबात वाटत नाही. अशा स्थितीत तिने सर्व काही संतुलित करून चालावे. ज्यासाठी मी सदैव तिच्या पाठीशी उभा असेन.
रणबीर कपूरचा आगामी ‘शमशेरा’ चित्रपट येत्या 22 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शमशेरा चित्रपटाद्वारे रणबीर कपूर तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमासाठी सज्ज आहे. शमशेराच्या ट्रेलरला चाहत्यांची चांगलीच पसंती दाखवली. आता प्रेक्षक प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांसाठी परदेशात गेली होती. आता आलिया या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करून भारतात परत आली आहे.

Latest Posts

Don't Miss