spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर,शेअर केला व्हिडिओ

अभिनेता रणदीप हुड्डा याचा आगामी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता रणदीप हुड्डा याचा आगामी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीप हुड्डाने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम करत प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.अशातच रणदीप ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. रणदीपनं ‘सरबजीत’, ‘सुलतान’ आणि ‘हायवे’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता लवकरच रणदीपचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच रणदीपनं जाहीर केली आहे. तसेच एक खास व्हिडीओ देखील रणदीपनं शेअर केला आहे.

रणदीपनं ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटानं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “अखंड भारत – स्वातंत्र्य वीर सावरकरांचे स्वप्न, भारताचे वास्तव -दूरदर्शी नेत्याला श्रद्धांजली, ज्याची कथा जिवंत गाडली गेली.” ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होत आहे.

रणदीपनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये “गद्दार? आतंकवादी? हीरो?” असं लिहिलेलं दिसत आहे. तसेच या व्हिडीओच्या शेवटी रणदीपचा,  “मुझे गांधी से नहीं, अहिंसा से नफरत है।” हा डायलॉग ऐकू येतो. या व्हिडीओला रणदीपनं कॅप्शन दिलं, “भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन नायक,एक सेलिब्रेटेड होते आणि एक इतिहासातून पुसले गेले. शहीद दिनी इतिहास पुन्हा लिहिला जाईल. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.”या चित्रपटात रणदीप हुड्डा याच्यासहित अंकिता लोखंडे आणि अमित सियाल यांच्यासह अनेक कलाकार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रणदीपनं या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

रणदीप हुड्डा यानं ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटासाठी 18 किलो वजन कमी केलं, असं म्हटलं जात होतं. पण याबाबत आता आनंद पंडित यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, रणदीपनं  26 किलो वजन कमी केले आहे. ते म्हणाले, “जेव्हा रणदीप हा माझ्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याचे वजन 86 किलो होते. त्या दिवसापासून तो चित्रपटातील या व्यक्तिरेखेचा अभ्यास करु लागला. त्यानं एक खजूर आणि एक ग्लास दूध असा डाएट फॉलो केला. रणदीपनं 4 महिने हा डाएट फॉलो केला”आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss