spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘लायगर’च्या ट्रेलर लाँचवेळी विजयची चप्पल पाहून; रणवीरने लावला डोक्याला हात

काल मुंबईत चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. सुपरस्टार रणवीर सिंगही मुंबईतील कार्यक्रमात पोहोचला,

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आगामी ब्लॉकबस्टर चित्रपट लायगरसाठी चर्चेत आहे. जेव्हापासून लायगरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून प्रत्येकजण पुन्हा एकदा विजयचा चाहता झाला आहे. या चित्रपटासाठी विजयने ज्या प्रकारे स्वत:ला तयार केले आहे ते कौतुकास्पद आहे. चित्रपटात विजय किक बॉक्सच्या भूमिकेत आहे. अशावेळी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. हैदराबाद आणि मुंबईत ठेवण्यात आला आहे. या ट्रेलर लॉन्च वेळी चित्रपटाची दिग्दर्शिका तसेच अभिनेत्री अनन्या पांडे देखील उपस्थित होती. त्याचबरोबर ट्रेलर लाँचवेळी अभिनेता रणवीर सिंग देखील मंचावर उपस्थित होता. त्यावेळी विजयची अतिशय साधी स्टाईल पाहून चाहत्यांची मनं तर खूश झाली, पण रणवीर सिंग मात्र आश्चर्यचकित झाला.

हेही वाचा

अभिनेता रणबीर कपूर तयारीत व्यस्थ, बाळाच्या येण्याची उत्सुकता

काल मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. दरम्यान सुपरस्टार रणवीर सिंगही मुंबईतील कार्यक्रमात पोहोचला, मात्र येथे सर्वांचे लक्ष विजय देवरकोंडाच्या साध्या लूककडे आणि चप्पलकडे होते. त्याच्याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात, सुपरस्टार विजय देवरकोंडा अतिशय साध्या लूकमध्ये आणि घरच्या चप्पलमध्ये दिसला.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग म्हणतो की, विजयचे स्वागत काय करायचे, तो हृदयात आहे आणि बघा तो किती साधा आहे. तो ट्रेलर लाँच सोहळ्याला चप्पल घालून आला आहे. रणवीर हसून पुढे म्हणतो, विजय तू तुझ्या ट्रेलर लॉन्चला आलास की माझ्या? यामुळे स्टेजवर एकच हशा पिकला. यादरम्यान विजय हसतो. रणवीर पुढे म्हणतो की, जॉननंतर जर कोणी सँडल स्टाइल केली असेल तर ती तूच आहेस.

 

Latest Posts

Don't Miss