spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रणवीर सिंगला न्यूड फोटोंचं स्वातंत्र्य मग हिजाबला विरोध का? – अबू आझमींचा सवाल

रणवीर सिंग ला न्यूड फोटोंचं स्वातंत्र्य मग हिजाबला विरोध का? - अबू आझमींचा सवाल

मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. त्याच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. फोटोंमध्ये रणवीर सिंगने न्यूड पोज दिल्या आहेत. यावर अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत.  काहींना रणवीरचे हे फोटो खूप आवडत आहेत, तर काही सोशल मीडिया यूजर्सने त्याला खूप ट्रोल केले आहे. दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी रणवीरच्या न्यूड फोटोंवर प्रतिक्रिया देताना निशाणा साधला आहे.

हेही वाचा

शिंदेंच्या बंडखोरीमागे भाजपचाच हात, उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याने केला खुलासा

 

अबू आझमी यांनी रणवीरचे न्यूड फोटो शेअर करत बॉलिवूडवर टीका केली आहे.  आझमीनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘हे लोक उघडे शरीर दाखवतात त्याला कला आणि स्वातंत्र्य म्हणतात.  दुसरीकडे, संस्कृतीनुसार मुलीला हिजाबने शरीर झाकावे लागत असेल तर त्याला छळ आणि धार्मिक भेदभाव म्हणतात.  आम्हाला कसला समाज हवा आहे?  सार्वजनिक ठिकाणी नग्न फोटो शेअर करण्याचे स्वातंत्र्य आहे, मग हिजाब का घालू नये?’ ‘नग्न फोटो सार्वजनिकपणे शेअर करणे त्यांच्यामते ठीक आहे;  मग शाळा, कॉलेज आणि अशा सर्व ठिकाणी जिथे महिलांना बुरखा किंवा हिजाब घालायचा आहे तिथे स्वातंत्र्य का नाही?’ असा सवाल आझमी यांनी केला आहे.

अभिनेता रणवीर सिंगने पेपर मॅगझिन वेबसाइटच्या कव्हरसाठी हे न्यूड फोटोशूट केले आहे. रणवीर सिंग अनेकदा वेगवेगळ्या किंवा रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसतो. पण त्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये रणवीर तुर्कीच्या गालिच्यावर शर्टलेस पोज देत आहे.

 

Latest Posts

Don't Miss