spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेतील शेवंता करणार या दिग्दर्शकाशी लग्न , हळदीचे फोटो झाले व्हायरल

या वर्षी अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकार हे लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. नुतच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardeek Joshi) यांचं लग्न झालयची बातमी समोर आली होती. त्यावर अक्षय आणि हार्दिकच्या चाहत्यांनी खूप जल्लोषही केला होता. तर हार्दिकच्या काही मित्रांनी त्याच्या लग्नाचे आणि हळदीचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले होते. त्याच पाठोपाठ बाळूमामा (Balumama) मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळेने (Sumeet Pusavale) देखील आज त्याच्या अधिकृत इस्टाग्राम खात्यावर पोस्ट करत लग्न बंधनात अडकल्याचे जाहीर केले होते. त्याच्या पाठोपाठच आता रात्रीस खेळ चाले ३ (Ratris Khel Chale 3) या मालिकेतील शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) सुद्धा लग्नबंधनात अडकणार आहे. यामुळे मराठी सिनेप्रेमींना कलाकारांकडून एका पाठोपाठ एक आनंदाच्या बातम्या मिळत आहेत.

२०२२ या वर्षातील शेवटचे दोन महिने हे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप आनंदाचे ठरत आहेत. कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि बिपाशा बासू (Bipasha Basu) या दोन अभिनेत्रींनी गोंडस मुलीला जन्म देऊन सर्वर सिनेप्रेमींना आनंदाची बातमी दिली होती. तर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी लग्न बंधनात अडकत चाहत्यांच्या आनंदात भर करून दिली आहे. डिसेंबर महिन्यात सर्वात प्रथम मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर जोशीचे लग्न झाले. त्यांच्या पाठोपाठ आजच बाबाळुमामा मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पुसावळेने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावरून लग्न बंधनात अडकल्याचे जाहीर केले. तर आता रात्रीस खेळ चाले ३ (Ratris Khel Chale 3) या मालिकेतील शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका तुळसकरने सुद्धा लग्नबंधनात अडकल्याचे जाहीर केले आहे. मुख्य म्हणजे कृतिका ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरूखकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. कालच यांच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम पार पडल असून त्यांच्या हळदीचे व्हिडीओ आणि फोटो हे सोशलमिडीयावर चांगलं व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक विशाल देवरूखकर हा गेल्या १३ वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत आहे. याने बॉईज , आणि बॉईजचित्रपटाच्या तीनही भागांचे दिग्दर्शन केल आहे. तर अभिनेत्री कृतिका तुळसक ही गेल्या १८ वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे.तिने रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंता या मुख्य भूमिकेत काम केल होत आणि मुख्य म्हणजे ती मानसोपचारतज्ज्ञ देखील आहे

हे ही वाचा : 

केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून देशात ड्रग्जच्या तस्कारीत वाढ, नाना पटोलेंच्या आरोप

अभिनेता वरुण धवनला कानाशी निगडित ‘व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ आजाराशी देतोय झुंज, जाणून घ्या या आजाराविषयी माहिती

श्रद्धा वाळकर हत्या प्रकरणात मोठी उपडेट, सापडलेली हाडे वडिलांच्या डीएनएशी जुळली

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss