रवी जाधव दिग्दर्शित ‘Taali’ चित्रपटाचा टीझर रीलीज, सुष्मिता सेन झळकणार किन्नरच्या भूमिकेत

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन बऱ्याच वर्षपासून ऑनस्क्रीन दिसली नाही. सुष्मिताचे चाहते तीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी फार उत्सुक झाले आहेत.त्यातच आता अभिनेत्री लवकरच नव्या कोऱ्या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रवी जाधव दिग्दर्शित ‘Taali’ चित्रपटाचा टीझर रीलीज, सुष्मिता सेन झळकणार किन्नरच्या भूमिकेत

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन बऱ्याच वर्षपासून ऑनस्क्रीन दिसली नाही. सुष्मिताचे चाहते तीला ऑनस्क्रीन पाहण्यासाठी फार उत्सुक झाले आहेत. त्यातच आता अभिनेत्री लवकरच नव्या कोऱ्या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक (Director) रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या बहुचर्चित वेब सिरीजचा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सिरीजमध्ये सुश्मिता सेन किन्नरच्या भूमिकेत दिसणार आहे.

या टीझरमधील सुष्मिता सेनचा किन्नरच्या भुमिकेतील जबरदस्त अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. रवी जाधव यांनी ‘ताली’ वेब सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सिरीजमध्ये सुष्मिता गौरी सावंतच्या भूमिकेत आहे, जी एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि किन्नर समाजासाठी काम करते. गौरीला आजवर आयुष्यात मोठ्या संघर्षांना सामोरे जावे लागले. टीझरच्या सुरुवातीला सुष्मिता सेन साडी नेसुन तयार होताना दिसत आहे. तिने गळ्यात साईबाबांचे लॉकेट घातले आहे. यानंतर ती म्हणते, “नमस्कार, मी गौरी सावंत आहे, जिला कोणी सामाजिक कार्यकर्ता, कोणी नपुंसक तर कोणी गेम चेंजर म्हणतात. तिची ही कथा. गालीपासुन तालीपर्यंत..”

प्रत्यक्षातील गौरी सावंत ही एक किन्नर असून तिचा जन्म ‘गणेश नंदन’ या नावाने झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. गौरी यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१३ मध्ये दाखल झालेला हा खटला होता, ज्यामध्ये २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देताना ट्रान्सजेंडरना तृतीय लिंग म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासीक आदेश दिले होते. दरम्यान आता ही वेब सिरीज याच गौरी सावंतच्या जिवंत आधारित असून सुष्मिता सेन यातील प्रमुख भूमिकेत म्हणजेच किन्नरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता ताली वेब सिरीज १५ ऑगस्टला Jio Cinemas वर रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा PROMO OUT

Delhi-Mumbai Indigo Flight मध्ये महिला प्रवासीचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षाच्या प्राध्यापकाला अटक

मुंबईकरांसाठी आनंददायक! Goregaon-Mulund Link Road चे काम सुरु,आता अंतर होणार कमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version