रेशम टिपणीस दिसणार नव्या मलिकेत

बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेशम टिपणीस तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. रेशम अनेकवर्ष इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आणि आता ती अनेक वर्षांनी आपली छाप पुन्हा उमटवायला छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

रेशम टिपणीस दिसणार नव्या मलिकेत

रेशम टिपणीस दिसणार नव्या मलिकेत

बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेशम टिपणीस तिच्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. रेशम अनेकवर्ष इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे आणि आता ती अनेक वर्षांनी आपली छाप पुन्हा उमटवायला छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. रेशम टिपणीस आता सोनी टीव्हीवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई ’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने एका मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिकेत रेशमी पाहायला मिळणार आहे. द्वारकाबाई होळकर असं तिच्या पात्राचं नाव असून अहिल्याबाईंच्या आयुष्यात काहीशी अडचण निर्माण करणारं हे पात्र असू शकत असा अंदाज सोनी टीव्हीने पोस्ट केलेल्या एका पोस्टरवरून लावता येतो आहे.सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हीजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्या’ ही मालिका अहिल्याबाई होळकरांचं आयुष्य उलगडून सांगणारी मालिका आहे. सध्या या मालिकेने आठ वर्षांची मोठी झेप घेतली असून मालिकेचा नवा अध्याय आजपासून उलगडणार आहे.

या  निमित्ताने रेशम पुन्हा टीव्हीवर झळकणार आहे त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाल्याचं समजत आहे. तसंच एक खास नातं म्हणजे बिग बॉस मराठी मधील दोन कलाकार या मालिकेच्या निमित्ताने आमने सामने येणार आहेत. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे हे बिग बॉस मराठी मध्ये एकाच सीझनमध्ये पाहायला मिळाले होते. एका मोठ्या गॅपनंतर दोघेही एकाच मालिकेचा भाग असणार आहेत.रेशम टिपणीस साकारत असलेलं पात्र नेमकं कसं असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे

Exit mobile version