लाल सिंघ चढ्ढा पहायला गेल्यामुळे रिंकू राजगुरू झाली ट्रोल

'लाल सिंग चड्ढाच्या स्क्रिनिंगदरम्यान... नक्की बघावा असा सिनेमा.

लाल सिंघ चढ्ढा पहायला गेल्यामुळे रिंकू राजगुरू झाली ट्रोल

Rinku Rajguru and Aamir Khan

मुंबई: आमीर खानचा हल्लीच प्रदर्शित झालेला सिनेमा लाल सिंघ चढ्ढा हा सध्या खूपच चर्चेत आहे. त्याचबरोबर आमिर खान आणि त्यांची पत्नी किरण राव यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानामुळे #बॉयकॉटलालसिंघचढ्ढा (#BoycotLalSinghChaddha) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या काही लोक ह्या सिनेमाच्या बाजूने आहेत तर काहीजण ह्या सिनेमाच्या विरुद्ध आणि त्यामुळेच या सिनेमाला पाठिंबा देणाऱ्या अनेकांना नेटकरी आता ट्रोल करत आहेत.

सध्या सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा निशाणा बनली आहे. लाल सिंघ चढ्ढा (Lal Singh Chaddha) हा सिनेमा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.पण त्याआधीच हा सिनेमा बॅन करण्यात यावा अशी मागणी अनेकांकडून होत होती. तर याच सिनेमा संबंधी रिंकू राजगुरूने एक पोस्ट शेअर केली आहे. जिच्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या विविध कॉमेंट्सना सामोरं जावं लागतंय. अभिनेत्रीने आमिर खान नागा चैतन्य या दोघांसह फोटो शेअर केला आहे. रिंकू म्हणतेय की, ‘लाल सिंग चड्ढाच्या स्क्रिनिंगदरम्यान… नक्की बघावा असा सिनेमा. आमिर खान प्रोडक्शन आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा’.

रिंकूची ही पोस्ट पाहून तिचे चाहते भडकले आहेत. काहींनी कमेंट केली आहे की आता यानंतर तुझेही चित्रपट Boycott केले जातील. ‘तुला अनफॉलो करतोय’, ‘असं नको करू, नाहीतर तु देखील बॉयकॉट’, ‘सॉरी रिंकू हा सिनेमा प्रमोट करू नको. तु कुठे होतीस जेव्हा आमिर हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवत होता?’, अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टवर केल्या जात आहेत. आणखी एक युजर म्हणतो आहे की, ‘लोकं तुझे पिक्चर बघणं सोडून देतील रिंकू… विचार करून प्रमोशन कर आमिरच्या पिक्चरचं’. याशिवाय इतर मराठी सिनेमांचं प्रमोशन का करत नाही असा सवालही काही चाहत्यांनी रिंकूला विचारला आहे.

दरम्यान रिंकूच्या या पोस्टवर अनेक अशा कमेंट्स आहेत ज्यामध्ये केवळ #BoycottLaalSinghChaddha लिहिण्यात आलं आहे.रिंकूच्या या पोस्टचा तिच्या आगामी सिनेमांवर परिणाम होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अभिनेत्रीच्या लेटेस्ट प्रोजेक्टबाबत बोलायचं झालं तर ती अलीकडेच आठवा रंग प्रेमाचा या सिनेमात अॅसिड अटॅक पीडितेच्या भूमिकेत दिसली होती.

Exit mobile version