spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘रूप नगर के चीते’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘मैत्री’ या शब्दात आनंद, दिलासा आणि आधार अशा तिन्ही गोष्टी आहेत. आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं, हाच आशय अधोरेखित करणाऱ्या ‘रूप नगर के चीते’ या आगामी मराठी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात संपन्न झाला.

‘मैत्री’ या शब्दात आनंद, दिलासा आणि आधार अशा तिन्ही गोष्टी आहेत. आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं, हाच आशय अधोरेखित करणाऱ्या ‘रूप नगर के चीते’ या आगामी मराठी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात संपन्न झाला.

हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देईल असा विश्वास चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केला. मैत्रीच्या नात्यातली आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते ती जपणे महत्त्वाचे असल्याचे सांगत हा चित्रपट प्रत्येकाला निखळ आनंद देईल, असं दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी याप्रसंगी सांगितलं. या चित्रपटातून प्रेक्षकांना बॉलीवूडसारखी भव्यता अनुभवायला मिळेल असं निर्माते मनन शाह यांनी सांगितलं. तसेच मनाच्या आतमध्ये स्वत:शी युद्ध सुरू असताना आपण करतोय ते चूक की बरोबर? याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा जवळचा मित्र गरजेचा असतो. त्याचंही म्हणणं ऐकणं महत्त्वाचं असतं, याच मैत्रीच्या बंधाची अनोखी गोष्ट ‘रूप नगर के चीते’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

नुकतीच लालबागच्या राजाच्या चरणी आगामी ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली. आणि चित्रपटाच्या यशासाठी बाप्पाचा आशिर्वाद घेतला. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि ‘लालबागचा राजा’च्या जयघोषात आपल्या चित्रपटाचे नवीन पोस्टर ही याप्रसंगी बाप्पाच्या चरणी अर्पण केले.

या चित्रपटाची निर्मिती एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे. येत्या १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभु, मुग्धा चाफेकर, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, सौरभ चौघुले, रजत कपूर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे. १६ सप्टेंबरला ‘रूप नगर के चीते’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

हे ही वाचा :

केदार शिंदेंची कन्या झळकणार ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटांमध्ये, महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss