spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Golden Globe Awardsच्या शर्यतीत दिसणार RRR, ‘या’ दोन विभागांसाठी मिळाले नामांकन

गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स हा पुरस्कार सोहळा ११ जानेवारी रोजी सुरु होणार आहे. आरआरआर या चित्रपटाने हिंदी पडद्यावर २७४ कोटी तर आंतराष्ट्रीय स्तरावर १२०० कोटी इतकी कमाई केली आहे.

बाहुबली फेम साऊथ दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाला देशभरच नाही संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळाली आहे. हा चित्रपट फक्त देशातच नाही परदेशातही आता यशस्वी होत आहे. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या आरआरआर या चित्रपटाने आणखी एक यशाची पातळी गाठली आहे. या चित्रपटाने आता गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या दोन विभागांमध्ये नामांकानांच्या श्रेणीत आपले स्थान पक्के केले आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स हा पुरस्कार सोहळा ११ जानेवारी रोजी सुरु होणार आहे. आरआरआर या चित्रपटाने हिंदी पडद्यावर २७४ कोटी तर आंतराष्ट्रीय स्तरावर १२०० कोटी इतकी कमाई केली आहे.

साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने देखील या चित्रपटात एक भूमिका साकारली आहे. एस एस राजामौली यांच्या या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या सर्वोत्कृष्ट नॉन – इंग्लिश चित्रपट आणि चित्रपटातील ‘नातू नातू’ सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्ग या दोन विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. भारतातील बॉलिवूडचा चित्रपट गंगुबाई काठियावाडी, कन्नड चित्रपट कांतारा आणि ऑस्करमध्ये आपली जागा कायम करणारा छेलो शो देखील नामांकनासाठी शर्यतीत होते. मात्र, आरआरआर या चित्रपटालाच दोन विभागांमध्ये नामांकन मिळालं आहे.

ऑल क्वाएट ऑफ द वेस्टर्न फ्रंट, (जर्मनी), अर्जेंटिना १९९५ (अर्जेंटिना), क्लोज (बेल्जियम) आणि डिसिजन टू लिव्ह (दक्षिण कोरिया) हे या चित्रपट श्रेणीत नामांकन मिळालेले इतर चार चित्रपट आहेत. आरआरआर हा चित्रपट सर्वत्र खूप प्रसिद्ध झाला आहे. जपानमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आणि त्यानंतर तो इतर भाषांमध्येही प्रसिद्ध करण्यात आला होता. या चित्रपटाच्या हिंदी आवृतीचा प्रीमियर २० मे रोजी नेटफलिक्सवर झाला आणि त्यानंतर लगेचच तो जगभर प्रसिद्ध झाला.

बेस्ट नॉन – इंग्लिश लँग्वेज विभाग:

बेस्ट नॉन – इंग्लिश लँग्वेज विभागात ऑल क्वाएट ऑफ द वेस्टर्न फ्रंट, (जर्मनी), अर्जेंटिना १९९५ (अर्जेंटिना), क्लोज (बेल्जियम) आणि डिसिजन टू लिव्ह (दक्षिण कोरिया) आणि RRR या चित्रपटांना नामांकन मिळालं आहे.

बेस्ट फिल्म ड्रामा विभाग:

अवतार, एल्विस, द फॅबलमॅनस आणि टॉप गन: मर्विक या चित्रपटांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन, मुंबईत १९९३ पेक्षाही मोठा धमाका करणार

भारताने सॉफ्टवेअर उत्पादनांचे केंद्र बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss