Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ने सुरुवातीला मुंबईत राहण्यासाठी खूप संघर्ष केला होता. तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात ती पेईंग गेस्ट म्हणून राहिली होती.

Sai Tamhankar Birthday Special: खडतर प्रवास ते मुंबईतील आलिशान घराची मालकीण, ‘अशी’ आहे सईच्या आयुष्याची गोष्ट

बोल्ड, ब्युटीफूल आणि बिनधास्त म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिचा आज २५ जून रोजी ३८ वा वाढदिवस आहे. छोट्या पडद्यावरून सुरुवात करणारी सही तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा पडदा पर्यंत पोहोचली. अनेकांप्रमाणेच तिचा प्रवास सुद्धा खडतर होता. सई ताम्हणकरने हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. क्रिती सेनोन (Kriti Sanon) सोबत सईने स्क्रीन शेअर केली होती. प्रसिद्ध झालेल्या ‘परमसुंदरी’ या गाण्यात सई डान्स करताना दिसली होती.

छोटा पडद्यावरील ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेत सईने अभिनय केला आणि तिची या क्षेत्रातली आवड वाढत गेली. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर दिमाखात एन्ट्री केली. बोल्डनेस आणि जास्त वजन यामुळे तिला बऱ्याचदा टीकेला सामोरे जावे लागले. परंतु, याचा कोणताही परिणाम तिने तिच्या करियरवर  होऊ दिला नाही. कोणतीही साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस असो किंवा मग फोटोची एक वेगळी अदाकारी असो, सई नेहमीच चर्चेत असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कॉमेडी शोमध्ये सई जजच्या भूमिकेत आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या फॅशन सेन्समुळे चाहते सईच्या प्रेमात पडत आहेत.

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ने सुरुवातीला मुंबईत राहण्यासाठी खूप संघर्ष केला होता. तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात ती पेईंग गेस्ट म्हणून राहिली होती. मुंबईला एक घर असावे अशी तिची इच्छा होती आणि ती इच्छा तिने २०२३ मध्ये पूर्ण केली. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) अभिनय क्षेत्रात जशी चर्चेचा विषय होती तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ती ट्रोल झाली होती. सई ताम्हणकरने अमेय गोसावी सोबत लग्न केले होते. २०१३ मध्ये त्यांचं लग्न झालं पण अवघ्या दोन वर्षांनी म्हणजेच २०१५ मध्ये सई आणि अमेय  यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आता सई ताम्हणकर निर्माता असलेल्या अनिश जोग याला डेट करत आहे. अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो धुमाकूळ घालत असतात.

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version