सई ताम्हणकरच्या ‘भक्षक’ वेब सिरीजची सगळीकडे होतेय चर्चा

अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या बोल्ड अंदाज आणि तिच्या अभिनय शैलीमुळे तिने चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे.

सई ताम्हणकरच्या ‘भक्षक’ वेब सिरीजची  सगळीकडे होतेय चर्चा

अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या बोल्ड अंदाज आणि तिच्या अभिनय शैलीमुळे तिने चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली आहे.मराठी चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व गाजवत सईने बॉलीवूडमध्ये देखील आपलं वर्चस्व गाठत आहे.सध्या सई तिच्या भक्षक या सिरीजमुळे चांगलीचं चर्चेत आली आहे. सई आता ओटीटी प्लॅटफॉर्म वर दिसून आली आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील “भक्षक” या चित्रपटामधून सई प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भक्षक या चित्रपटामधल्या “जस्मीत गौर” या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांनमध्ये आपल्या अभिनयाचे पैलू दाखवले आहेतय

भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला भक्षक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट अनेक सामाजिक विषयावर भाष्य करणरा चित्रपट हे. या चित्रपटाने सगळ्यांना एक खास सामाजिक संदेश सुद्धा दिला. सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि स्त्री सक्षमीकरण असलेल्या तिच्या आजवरच्या अनेक भूमिकांतून आपण सगळ्यांनी तिला पाहिलं. या चित्रपटात तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक केलं जातंय हे देखील तितकच खरं!

भक्षक या चित्रपटात जस्मीत गौर ही भूमिका प्रेक्षकांना आपलंसं करणारी ठरली आहे .या चित्रपटात अनेक तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.सईचा रुबाबदार पणा आणि कणखर पणा या सिरीजमधून आपल्याला पाहायला मिळत आहे.तिच्या या खास भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते यावर भक्षक या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं असून भक्षक मध्ये एक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणारी सई अव्वल ठरली आहे.सईने पहिल्यांदा रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट केला असून भविष्यात सई अजून दर्जेदार काम करणार आहे. 2024 वर्षातला सईचा हा दुसरा प्रोजेक्ट्स आणि तो सुद्धा नेटफ्लिक्स सोबत असल्याने खास ठरला. आगामी काळात सई ताम्हणकर अजून काय दमदार काम करणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे.दरम्यान सईचा श्रीदेवी प्रसन्न हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे.प्रेक्षक देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहे.

हे ही वाचा: 

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

मिथुन चक्रवती यांच्या तब्यतीत सुधारणा,लेकानी दिली हेल्थ अपडेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version