spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sai Tamhankar करणार जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व

मराठी सिनेसृष्टीतील सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही तिच्या बोल्ड-बिंदास ( Bold - BINDAS) अंदाजाने नेहमी लोकांचे लक्ष वेधून घेत असते. सई तिच्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर नेहमी छाप सोडत आली आहे. मिशन पॉसिबल, वजनदार, धुरळा यासारख्या चित्रपटांमध्ये सईने विविध भूमिका बजावून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही तिच्या बोल्ड-बिंदास ( Bold – BINDAS) अंदाजाने नेहमी लोकांचे लक्ष वेधून घेत असते. सई तिच्या चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर नेहमी छाप सोडत आली आहे. मिशन पॉसिबल, वजनदार, धुरळा यासारख्या चित्रपटांमध्ये सईने विविध भूमिका बजावून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. इतकेच नाही तर आता सईने बॉलीवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. मिमी, लॉकडाऊन यासारख्या चित्रपटांमध्ये सई झळकली आहे. फिल्म फेअर (filmfare) साठी तिचे नामांकनही झाले होते. अशी सई ताम्हणकर तिच्या बिंदास स्वभावाने नेहमी कौतुकास्पद चर्चेत असते. पण आता मात्र सईने कहरच केला. तिच्या चाहत्यांसाठी सई आनंदाची बातमी घेऊन अली आहे ती म्हणजे जागतिक पातळीवर महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना सई दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 सईची ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र (Postcards from Maharashtra) ही वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.’पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ ही वेबसीरिजमध्ये महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रार्थनास्थळे, किल्ले, जुनी स्मारके यांच्यापासून ते महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिकच्या दिव्य मंदिरांपर्यंतच्या ठिकाणांवर प्रकाश टाकणार आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील खाद्य संस्कृती आणि शॉपिंग ठिकाणांचा शोध घेताना सई दिसणार आहे.

‘राष्ट्रीय पर्यटन दिनी’ (National Tourism Day) सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ या वेबसिरीज बद्दल सोशल मीडिया द्वारे माहिती दिली आहे. सई म्हणाली माझं स्वत:चं राज्य नव्याने एक्सप्लोर करणं ही खरच खूप कमाल गोष्ट ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र’ या वेबसीरिजच्या माध्यमातून मला करता आली. या संधीमुळे मी महाराष्ट्राचं सौदर्य जवळून अनुभवलं. तसेच रुचकर पदार्थ आणि महाराष्ट्राची संस्कृती नव्याने अनुभवता आली. या वेबसीरिजचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. ही वेबसीरिज माझ्यासाठी कायम खास असेल”. वेबसीरिजचा प्रीमियर २९ डिसेंबर २०२२ रोजी ‘नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर’ प्रदर्शित झाला आहे. तसेच हि वेबसिरीज सात भागांची असून याचे तीन भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. ही वेबसीरिज प्रेक्षक डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

 

हे ही वाचा:

साखर उद्योगासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर केली चर्चा

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप सोपवणार ‘या’ नेत्यांकडे जबाबदारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss