साजिद खानच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून अभिनेत्रीवर लैंगिक छळाची तक्रार दाखल

साजिद खानच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून अभिनेत्रीवर लैंगिक छळाची तक्रार दाखल

साजिद खान हा बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व मुख्यत: नृत्यदिग्दर्शक फराह खानचा लहान भाऊ आहे. तसेच साजिद खान स्वतःच मोठे दिग्दर्शकही आहेत. त्यानी हमशकल्स, हिम्मतवाला, हे बेबी सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. साजिद खानवर या आधीही लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे त्याला काही काळ इंडस्ट्रीच्या बाहेर राहावे लागले होते तेव्हा आरोप कारण्यातआले होते पण आता तर सरळ तक्रार दाखल करण्यात आली आहे , हि तक्रार अभिनेत्री शर्लिनने काल जुहू पोलीस ठाण्यात जाऊन दाखल केली आहे.

काल संध्याकाळी शरलीन चोप्राने जुहू पोलीस ठाण्यात जाऊन साजिद खान यांच्या विरोधात लैंगिक चाल केल्याची तक्रार करून जबाब नोंदवला आहे. नंतर लगेचच शरलीन चोप्रा यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले कि “महिला पोलीस अधिकाऱ्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे. तसेच, पोलिसांनी आश्वासन दिलंय की, ते साजिद खानला लवकरात लवकर बिग बॉसच्या घरातून बोलवून त्याचा जबाब नोंदवणार आहेत. दरम्यान, दिग्दर्शक साजित खान बिग बॉस सीझन १६ मधील स्पर्धक आहे.

तसेच “सलमान खान यांना मी भाईजान बोलते, म्हणजे मी त्यांच्या बहिणी सारखीच आहे. त्यांनी माझी मदत करावी. मी सलमान खान यांच्या घराबाहेर शंतीपूर्वक आंदोलन करणार असल्याचं तिने माध्यमांना सांगितले .

पुढे तिने सांगितल कि “जुहू पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा करावी. मग आरोपी कोणीही असो, तो फराह खानचा भाऊ असो किंवा सलमान खानचा लाडका असो. आज आरोपी बिग बॉसच्या घरात बसून आराम करतोय. मला न्याय हवाय. त्यासाठीच मी पोलिसांकडे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी आणि योग्य तो तपास करुन आरोपी साजिद खानला अटक करावी.”

हे ही वाचा :

Rana VS Kadu: रवी राणा, बच्चू कडू वादात आता मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

कुठे नेऊ ठेवला महाराष्ट्र ? टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर!

जरी शिंदेंसोबत असलो तरी, मिलिंद नार्वेकरांबद्दल वाईट चितलं जाणार नाही – उदय सामंत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version