Tuesday, September 24, 2024

Latest Posts

सलमान खानने सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या केला लग्नावर शिक्कामोर्तब, शुभेच्छा देताना म्हणाला….

'वीकेंड का वार' च्या या एपिसोडमध्ये सलमान खानने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत यांचे शोमध्ये भव्य पद्धतीने स्वागत केले.

बॉलीवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ मधील वीकेंड का वार हा सर्वात खास समजला. यादरम्यान सलमान सर्व स्पर्धकांना आपली चूक तर दाखवतोच, पण शोमध्ये आलेल्या खास पाहुण्यांचे स्वागतही करतो. या आठवड्यात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग त्यांच्या ‘थँक गॉड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आले होते. जिथे सलमान सिद्धार्थ मल्होत्राला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसला.

‘वीकेंड का वार’ च्या या एपिसोडमध्ये सलमान खानने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत यांचे शोमध्ये भव्य पद्धतीने स्वागत केले. यादरम्यान सिद्धार्थने सांगितले की, तो पहिल्यांदाच त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या डेब्यू चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आला होता. त्यावेळी सलमान आणि सिद्धार्थने त्यांचे अॅब्स दाखवले होते. ही चर्चा सुरू असताना सलमानने सिद्धार्थच्या लग्नाचा उल्लेख करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर कियारा अडवाणीचे नाव घेऊन त्याने त्याला गंमतीदार प्रश्न देखील विचारले.

सलमान खानने अगदी अनोख्या पद्धतीने सिद्धार्थचे अभिनंदन केले. तो म्हणाला, ‘अभिनंदन सिद्धार्थ. लग्नाच्या शुभेच्छा.’ यानंतर सलमान खानने कियाराचे नाव घेऊन त्याची खोड काढली आणि म्हणाला, ”कितना कियारा डिसीजन आपने लिया है. सॉरी प्यारा डिसीजन. किसके आडवाणी, ओह क्या हो रहा मुझे. किसके एडवाइस पर लिया आपने ये डिसिजन. या वेळी सिद्धार्थ देखील अगदी गंमतीत सलमान खानला म्हणाला, भाई, तुम्ही लग्नाचे सल्ले देताय, यावर सलमान खान कियाराला संदेश देत म्हणाला, “बघ कियारा याला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये.”

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

ColorsTV (@colorstv) ने सामायिक केलेली पोस्ट

सिद्धार्थ त्यांच्या नात्याबद्दल म्हणाला…

सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीसोबतच्या नात्याबद्दल यावेळी बोलला. तो म्हणाला, ‘ती माझी को-स्टार आहे आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. लग्न कधी आणि कुठे होणार? हे तुला सांगता येणार नाही.’ यानंतर सिद्धार्थ म्हणाला की, सध्या त्याची पहिली प्राथमिकता कामाला आहे. नुकतीच या दोघांची जोडी ‘शेरशाह’ या सुपरहिट चित्रपटात दिसली होती आणि त्यानंतरच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा:

Sasural Simar ka: ‘ससुराल सिमर का’ फेम ‘या’ अभिनेत्रीने केली आत्महत्या इंदूरमध्ये गळफास घेऊन संपवले आयुष्य

Nirmala Sitharaman : रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे : निर्मला सीतारामन यांचे विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss