टीना दत्ता आणि शालीन भानोतच्या रिलेशनशिपमध्ये सलमान खानची एंट्री

टीना दत्ता आणि शालीन भानोतच्या  रिलेशनशिपमध्ये सलमान खानची एंट्री

बिग बॉस १६ हा कार्यक्रम भारतातील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. बिग बॉस १६ च्या घरातील नातेसंबंध खूपच चर्चेत असले तरीही गुंतागुंतीचे आहेत. कारण टीना दत्ता (Tina Datta) आणि शालीन भानोत (Shalin Bhanot) यांच्यातील नाते संबंध हा सध्या एक चर्चेचा मुद्दा झाला आहे. शालीन (Shalin Bhanot) आणि टीना (Tina Datta) यांच्या मैत्रीचे रूपांतर लवकरच प्रेम संबंधात बदलेल, असा विचार त्यांच्या चाहत्यांनी केला. टीना आणि शालीन यांनी एकमेकांबद्दल प्रेमाची भावना असल्याची कबुली अगोदरच दिली होती. त्यानंतर शालीन भानोत आणि टीना दत्ता यांच्यात भांडण झाले होते. नंतर त्यांनी असेही म्हटले होते की ते प्रेमात नाहीत. पण आता भांडणानंतर ते पुन्हा पुर्वव्रत एकमेकांना त्यांच्या नावाने हाक मारतानाही दिसले तसेच, नवीन वर्षाच्या कॉन्सर्टमध्ये जेव्हा दोघे एकमेकांसोबत डान्स करताना दिसले त्यानंतर स्पर्धक आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावर नवीन प्रोमोमध्ये होस्ट सलमान खानने (Salman Khan) सुद्धा शालीन (Shalin Bhanot) आणि टीना (Tina Datta) यांच्यातील नातेसंबंधांवर भाष्य करत ते खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे.

नुकताच कलर्स वाहिनीने बिग बॉस १६ चा (Bigg Boss 16) एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोत कार्यक्रमाचा होस्ट सलमान खान (Salman Khan) याने शालीन भानोत (Shalin Bhanot) आणि टीना दत्ता (Tina Datta) यांच्यातील प्रेमसंबंधांवर भाष्य केले आहे. या प्रोमोत असे दिसत आहे की, सलमान खान हा “टीना दत्ता ही गेममध्ये पुढे जाण्यासाठी शालिन भानोटचा वापर करत होती का?” असा सवाल टीना दत्ताला (Tina Datta) विचारताना दिसतो आहे. पुढे सलमान खानाने (Bigg Boss 16) टीना दत्तला विचारले आहे की “तू कोणता गेम खेळत आहेस आणि कोणासोबत?” यावर टीना गोंधळात पडल्यासारखी दिसते आहे. त्यानंतर सलमान खानाने, टीना आणि शालीन यांच्यातील प्रेमसंबंधांमध्ये सुसंगतता नसल्याचे सांगितले आहे. याचे कारण स्पष्ट करताना सलमान खानाने (Salman Khan) सांगितले की ज्या वेळेस टीना (Tina Datta) ही खेळात कमकुवत असते त्यावेळेस ती शालिन भानोतकडे जाते आणि जेव्हा ती मजबूत असते तेव्हा त्याला काढून टाकते.” असे सलमान खान याने सांगितले आहे.

सलमान खान याने (Salman Khan) पुढे सांगितल की “टीना दत्ता (Tina Datta) आणि शालीन भानोत (Shalin Bhanot) संगीत सुरु होण्या आधी या दोघांमध्ये भांडण झाले होते, आणि संगीत सुरु होताच दोघे एकत्र डान्स करताना दिसले.” सलमान खानच्या या वक्तव्याचे समर्थन करत घरातील इतर सदस्यांनीही टीना शालिनचा वापर करत असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Watch Video, रितेशच्या प्रश्नांच करीना कपूरने पहिल्यादांच दिल मराठीत उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version