Sameer Khakhar यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दु:खद निधन

सतीश कौशिक यांच्या निधनाने इंडस्ट्री अजून उठली नव्हती की प्रसिद्ध अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले. फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Sameer Khakhar यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दु:खद निधन

सतीश कौशिक यांच्या निधनाने इंडस्ट्री अजून उठली नव्हती की प्रसिद्ध अभिनेते समीर खाखर (Sameer Khakhar) यांचे निधन झाले. फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दूरदर्शनच्या ‘नुक्कड’ या प्रसिद्ध मालिकेत कवडी ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात नावलौकिक मिळवलेले अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. समीर खाखर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर वैद्यकीय समस्या होत्या. काल दुपारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर समीर यांना बोरिवलीच्या एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

७१ वर्षीय समीर खाखर यांचा मुलगा गणेश खाखर यांनी सांगितले- ‘त्यांचा शेवटचा काळ बेशुद्धावस्थेत गेला. लघवीचा त्रास झाल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि त्यानंतर हृदयाने साथ देणे बंद केले. मल्टिपल ऑर्गन निकामी झाल्याने पहाटे ४.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. समीर खाखर हे ९० च्या दशकातील चित्रपटांमध्ये प्रसिद्ध नाव बनले होते. पण, काही काळानंतर त्यांनी अभिनय जगताचा निरोप घेतला. एवढेच नाही तर १९९६ मध्ये ते देश सोडून अमेरिकेत राहू लागले होते. समीर हे अमेरिकेत काम करत असताना खूश होते. पण २००८ मध्ये मंदीमुळे त्याची नोकरी गेली.

समीर यांनी ‘नुक्कड’ या मालिकेतून अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ते दूरदर्शनच्या ‘सर्कस’ या मालिकेत चिंतामणीची भूमिका साकारताना दिसले. समीरने डीडी मेट्रोच्या ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेत चित्रपट दिग्दर्शक टोटोची भूमिकाही साकारली होती. याशिवाय ‘संजीवनी’ या मालिकेतही त्याने गुड्डू माथूरची भूमिका साकारली होती. तसेच ‘हसी तो फसी’, ‘जय हो’, ‘पटेल की पंजाबी शादी’ यांसारख्या चित्रपटात काम केले. समीर खाखर हे झी 5 च्या सनफ्लॉवर वेब सीरिजमध्येही दिसले होते.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version