जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी संदीप पाठक सन्मानित

जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी संदीप पाठक सन्मानित

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक हे त्यांच्या विनोदी अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत आले आहेत. तसेच पुन्हा एकदा संदीप हे त्यांच्या ‘राख’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते संदीप पाठक यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. १५ ते ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.

हेही वाचा : 

चंद्रशेखर बावनकुळे राज ठाकरेंच्या भेटीस शिवतीर्थावर, भाजप आणि मनसेच्या सततच्या भेटीमागचं रहस्य काय ?

संदीप पाठक यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हि माहिती दिली आहे. चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. एखाद्या मराठी अभिनेत्याला जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलं हि मराठी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे.

याप्रसंगी संदीप पाठक यांनी आपली भावना व्यक्त केली, “आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी आहे’ अशा भावना त्यांनी केल्या आहेत.

हरतालिकेचा उपवास करत आहेत ? तर, उपासना पद्धत आणि योग्य जाणून घ्या

Exit mobile version