Maharashtra Shahir ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील साने गुरुजींचा पहिला लूक आऊट

Maharashtra Shahir ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील साने गुरुजींचा पहिला लूक आऊट

महाराष्ट्राला शाहिरांची परंपरा लाभली आहे. कृष्णराव गणपतराव साबळे (Krishnarao Ganpatrao Sable) उर्फ ‘शाहीर साबळे’ हे नाव माहीत नसलेला मराठी माणूस महाराष्ट्रात नसेल. एक मराठी लोकशाहीर म्हणून तर ते प्रसिद्ध होतेत शिवाय भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर म्हणून साबळे यांचे फार मोठे योगदान आहे. यावर मराठमोळे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील साने गुरुजींचा लूक आज आऊट झाला आहे.

साने गुरुजी यांच्या जन्मदिनानिमित्त आज ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील साने गुरुजींची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. केदार शिंदेंनी एक खास पोस्ट शेअर करत त्यात लिहिलं आहे,”जीवनाच्या प्रवासात योग्य गुरू लाभला तर तो आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे शाहीर साबळे आणि त्यांचे गुरू साने गुरुजी”.

हेही वाचा : 

Paris Olympics 2024 साठी फ्रान्स घेणार AI सुरक्षा आणि नियंत्रण पध्द्तीची मदत

केदार शिंदेंनी पुढे लिहिलं आहे,”वेळोवेळी शाहिरांच्या जीवनात येऊन त्यांना दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे कारण असलेले साने गुरुजी यांचा आज जन्मदिवस. त्याच प्रित्यर्थ तुमच्या समोर सादक करतो आहोत ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील साने गुरुजी यांची पहिली झलक. साने गुरुजींच्या भूमिकेत अमित डोलावत. गुरू शिष्याचं नातं उलगडणार… २८ एप्रिल २०२३ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात”.

शाहीर साबळेंची ‘महाराष्ट्राची लोकधारा’

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात, तसेच मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तकदेखील समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते आणि दिग्दर्शक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीला समाजात ओळख मिळवून दिली. त्यांचे ‘गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) झळकणार आहे. या सिनेमाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. तर सिनेमाला संगीत महाराष्ट्राची लाडकी जोडगोळी अजय- अतुल यांचे असणार आहे.

जुळ्या मुलांसह Isha Ambani मुंबईत दाखल, कुटुंबीयांनी केले जंगी स्वागत

Exit mobile version