spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Leela Bhansali प्रस्तुत ‘हिरामंडी’ची रिलिज डेट झाली जाहीर… पाकिस्तानच्या रेड लाइट एरियाची कहाणी

अनेक बहुचर्चित चित्रपट बनवल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एका नवीन भव्यदिव्य वेबसिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत .१८ फेब्रुवारीला या बहुचर्चित वेब सिरीजचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या समोर आला. या वेब सिरीजच नाव 'हिरामंडी' आहे . संजय लीला भन्साळी प्रस्तुत ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच पाहायला मिळणार आहे.

सध्याच्या काळात अनेक युवकांना टेलिव्हिजण वरील कन्टेन्ट बघण्यापेक्षा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सस वरचे कन्टेन्ट पाहायला अधिक आवडते.अशीच एक नवीन ऑनलाईन वेबसेरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनेक बहुचर्चित चित्रपट बनवल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एका नवीन भव्यदिव्य वेबसिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत .१८ फेब्रुवारीला या बहुचर्चित वेब सिरीजचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या समोर आला. या वेब सिरीजच नाव ‘हिरामंडी’ आहे . संजय लीला भन्साळी प्रस्तुत ही वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच पाहायला मिळणार आहे.

तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की हिरामंडी म्हणजे काय ? तर हिरामंडी हे एका पाकिस्तानातील जिल्हाचे नाव असून पूर्वीच्या काळी हा एक रेड लाइट एरिया होता. खरतर हिरामंडी या जागेच नाव पंजाबचा राजा रजत सिंगचा मंत्री हिरासिंग याच्या नावावर ठेवण्यात आले होते. त्याकाळी या जागेला शाहिमंडी म्हणून देखील ओळखले जायचे. पहिल्यांदा हिरामंडी या नावाचा उल्लेख करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटात करण्यात आला होता.वर्षाच्या अखेरीस ही वेब सिरीज रिलिज होणार आहे.

लाहोरच्या तटबंदीच्या आत, टाकसाली गेटजवळ,आणि दक्षिणेला ही हिरामंडी आहे. ही जागा ऐतिहासिकदृष्ट्या १५ व्या आणि १६ व्या शतकापासून शहराच्या परिष्कृत तवायफ संस्कृतीचे केंद्र होता.ही वेब सिरीज १९४० च्या दशकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अशांत पार्श्‍वभूमीवर मांडलेल्या गणिका आणि त्यांच्या संरक्षकांच्या कथांमधून हीरामंडी या चमकदार जिल्ह्याचे सांस्कृतिक वास्तव शोधते. प्रेम, विश्वासघात, वारसाहक्क आणि कोठड्यातील राजकारण यांचे मिश्रण (गणिकांचं घर) यात पाहायला मिळेल .

 

हे ही वाचा:

NEET UG Result 2023: नीट परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्याने मारली बाजी; राज्यातून पहिला

Ashadhi Wari 2023, श्री संत सोपानकाका पालखीचे प्रस्थान निघाले पंढरीस

आषाढीसाठी विठुरायाच्या दगडी मुर्त्या बाजारात सज्ज; लाखो रुपयांची उलाढाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss