spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवीन वर्षातली पहिली संकष्टी,चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या…

नवीन वर्षातली पहिली संकष्टी,चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या.

नवीन वर्षातील  पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला शास्त्रात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्तव आहे.जी व्यक्ती या दिवशी व्रत करुन श्रीगणेशाची पूजा करते, त्याची सर्व संकटं दूर होतात, अशी श्रद्धा आहे. या दिवशी गणपतीच्या उपासनेमुळे संतानप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो आणि प्रत्येक दुःख नष्ट होते. भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद मिळतो, असा समज आहे.

संकष्टीच्या दिवशी चंद्राची  पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या वर्षी संकष्टी चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत,आणि या दिवशी उपवास धरला जातो,आणि चंद्रोदयाच्या वेळेला उपवास सोडला देखील जातो, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संकष्टी चतुर्थी २०२४ चे शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

पंचांगानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी २९ जानेवारीला, म्हणजेच सोमवारी आहे. सकाळी ६.१० वाजता संकष्टी सुरू झाली आहे आणि दुसऱ्या दिवशी, ३० जानेवारी रोजी सकाळी ८.५४ वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीमुळे संकष्टी चतुर्थी २९ जानेवारीलाच साजरी होत आहे.संकष्टी चतुर्थीला २९ जानेवारी रोजी रात्री ९.१० वाजता चंद्रोदय होईल. आज चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. देशाच्या विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळा वेगळ्या असतात.

वैदिक दिनदर्शिकेनुसार, या वर्षी संकष्टी चतुर्थी व्रताच्या दिवशी अनेक शुभ योग तयार झाले आहेत. ज्यामध्ये शुक्र, मंगळ आणि बुधपासून त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शोभन योगही तयार होत असून, याला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. या योगात पूजा केल्याने दुप्पट फळ मिळते असे मानले जाते. आज समसप्तक योग देखील तयार झाला आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाला. त्यानंतर आंघोळ करून विधीनुसार गणेशाची पूजा करावी. सर्वप्रथम गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी.त्यानंतर पूजेमध्ये तीळ, गूळ, लाडू, फुले, कलशात पाणी, धूप, चंदन, केळी किंवा नारळ प्रसाद म्हणून ठेवावे. यानंतर देवाला चंदनाचा टिळा लावावा. फुले व पाणी अर्पण करा.त्यानंतर श्रीगणेशाला तिळाचे लाडू व मोदक अर्पण करा. अगरबत्ती पेटवा आणि श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. उपवास करत असाल तर अन्नाचे सेवन अजिबात करू नका. संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी.रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.

हे ही वाचा:

कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण, नाशिक बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद

किरीट सोमय्यांचे आव्हान, संजय राऊतमध्ये हिंमत असेल ना तर त्यांनी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss