spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संतोष जुवेकरचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

झेंडा (Zenda), मोरया(Morya), एक तारा आणि यासारखे अनेक चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (Actor Santosh Juvekar) याची ओळख आहे.

झेंडा (Zenda), मोरया(Morya), एक तारा आणि यासारखे अनेक चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर (Actor Santosh Juvekar) याची ओळख आहे. तसेच तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अभिनेता संतोष हा अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. सध्या गणेशोत्सवाचे वातावरण आहे. कलाकार गणेशोत्सवाचे फोटो शेअर करत आहे. यातच संतोषने त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा देखील केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by BABAGANOUSH (@thebabaganoush_)

संतोषचे गणेशोत्सवाशी वेगळे नाते आहे. त्याचा ‘मोरया’ चित्रपट आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली. आता पुन्हा एकदा तो गणेशोत्सवाशी निगडीत आगळावेगळा प्रोजेक्ट घेऊन आपल्या भेटीला आला आहे. नुकतीच त्याने याबाबत घोषणा केली. अभिनेता संतोष जुवेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे. संतोष जुवेकरचे लवकरच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे नाव ‘मोरया रे’ असे आहे. या गाण्याचे पोस्टर शेअर करून संतोषने कॅप्शनही दिले आहे. तो म्हणतो, ‘बापाच्या चरणी अर्पण करून लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतोय “मोरया रे” गाणं’.

संतोषच्या या नव्या गाण्यामुळे चाहते खुश झाले आहे. संतोषची ही पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टवर अनेकांनी लाइक आणि कमेंटही दिल्या आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात सर्वत्र विसर्जनाचा जल्लोष मात्र अपघाताच्या घटनांमुळे लागतंय विसर्जनाला गालबोट

हनी सिंगने पत्नी शालिनी तलवारपासून घटस्फोट घेतला, पोटगी म्हणून ही मोठी रक्कम दिली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss