ब्रेकअप नंतर पुन्हा एकत्र दिसले सारा अली खान आणि कार्तिक आर्यन

अवॉर्ड सोहळ्यात सारा आणि कार्तिक दोघेही एकत्र फोटोज काढताना दिसून आले. कार्तिक आणि साराला पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे.

ब्रेकअप नंतर पुन्हा एकत्र दिसले सारा अली खान आणि कार्तिक आर्यन
बॉलिवूड मध्ये अनेक कपल एकत्र येऊन नंतर त्यांच्या ब्रेकअप च्या स्टोरीज अनेकदा चर्चेत ठरताना दिसतात. तर अशीच एक जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेत दिसून येतेय. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा ‘लव आज कल 2’ या चित्रपटाच्या शुट दरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघे एकमेकांना डेट करत होते, या चर्चा देखील तेव्हा सुरु होत्या.
‘लव आज कल 2’ हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरीही सारा आणि कार्तिक अनेकदा एकमेकांसोबत दिसून यायचे. पण त्यांचं हे प्रेम फार काळ टिकलं नाही. त्यांच्या ब्रेकअप ची माहिती चाहत्यांपर्यंत पोहचल्यानंतर अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारले होते. मात्र त्यानंतर त्यांच्या एकत्र न भेटण्याने चाहत्यांनी चर्चेला पूर्णविराम दिला होता.
नुकत्याच पार पडलेल्या पिंकविला स्टाईल आयकॉन अवॉर्ड सोहळ्यात सारा आणि कार्तिक दोघेही एकत्र फोटोज काढताना दिसून आले. कार्तिक आणि साराला पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. कार्तिक चा ‘भूलभुलैया 2’ हा चित्रपट सध्या धुमाकूळ घालताना दिसून येतोय. तर सारा ‘अंतरंगी रे’ या चित्रपटात शेवटची दिसून आली होती.
Exit mobile version