spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sara Ali Khan ने पुन्हा आठवल्या Sushant Singh Rajput सोबतच्या आठवणी

सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांचा केदारनाथ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले होते.

सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांचा केदारनाथ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले होते. आज सुशांत सिंह राजपूत पुण्यतिथीला तीन वर्षे झाली आहेत. सुशांतने अनेक प्रसिद्ध चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. त्यामधील एम एस धोनी, केदारनाथ, चिंचोरे, दिल बेचारा यासारखे अनेक चित्रपटांमध्ये त्याने त्याच्या कामगिरीमुळे अनेक चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याआधी सुशांतने बऱ्याच प्रसिद्ध हिंदी मालिका आणि रिऍलिटी शोमध्ये सुद्धा काम केले आहे. केदारनाथ चित्रपटामधील सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती आणि हे दोघेही चांगले मित्र होते.

आज सुशांतची तिसरी पुण्यतिथी आहे यामुळेच सुशांतची को-ऍक्टर सारा अली खानने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुशांत सोबत फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ते दोघे हेलिकॉप्टरमध्ये शूटला जाताना दिसत आहेत. साराने दोन फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये ते दोघेही केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंग च्या दरम्यान स्क्रिपट वाचताना दिसत आहेत. साराच्या या फोटोला तासाभरातच लाखो लाईक आणि कॉमेंट्स आल्या आहेत.

साराने शेअर केलेली पोस्टच्या खाली कॅप्शन लिहिले आहे की, “केदारनाथला पहिल्यांदाच जाताना. मी पहिल्यांदा चित्रीकरणाच्या मार्गावर आहे. आणि मला माहित आहे की दोघांनाही पुन्हा पूर्वीसारखे वाटणार नाही. पण कृती, कट, सूर्योदय, नद्या, ढग, चंद्रप्रकाश, केदारनाथ आणि अल्ला हू यांच्यामध्ये कुठेतरी मला माहित आहे की तू तिथे आहेस. तुमच्या ताऱ्यांमध्ये चमकत राहा, केदारनाथ ते एंड्रोमेडा पर्यंत…. असे कॅप्शन साराने त्या दोघांच्या फोटोखाली लिहिले आहे.

हे ही वाचा:

NEET UG Result 2023: नीट परीक्षेत मुंबईच्या विद्यार्थ्याने मारली बाजी; राज्यातून पहिला

Sushant Singh Rajput ला जाऊन आज तीन वर्ष पूर्ण, कुटुंबीय आज ही शोकात…

आषाढीसाठी विठुरायाच्या दगडी मुर्त्या बाजारात सज्ज; लाखो रुपयांची उलाढाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss