spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Savani Ravindra चा वेगळाच अनुभव, मतदान न करताच परतली

आज (१३ मे सोमवार) लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्याचे (Loksabha Election 2024 Fourth Phase)मतदान पार पडेल. आज ११ मतदारसंघात निवडणूक होणार असून यामध्ये अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, मावळ, औरंगाबाद, जालना, जळगाव, रावेर, नंदुरबार आणि शिरूर या भागात चुरशीची लढत होईल.

लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्याचे (Loksabha Election 2024 Fourth Phase) मतदान पार पडले. ११ मतदारसंघात निवडणूक झाली असून यामध्ये अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, मावळ, औरंगाबाद, जालना, जळगाव, रावेर, नंदुरबार आणि शिरूर या भागात चुरशीची लढत झाली. सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले होते त्यानंतर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला. सकाळपासूनच सामान्य नागरिकांसह सेलिब्रेटी देखील मतदानाच्या रांगेत उभा राहिलेले दिसून आले. सकाळपासून अनेक बड्या कलाकारांनी आपला मताचा हक्क बजावला. यात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), सुबोध भावे (Subodh Bhave)सह बेला शेंडे (Bela Shende) आणि अगदी जुनिअर एनटीआर (Jr.NTR) ते अल्लू अर्जुनने (Allu Arjun) देखील मतदान केले आहे.

बऱ्याच जणांना आपले नाव मतदार यादीत नसल्याचा फटका देखील बसला. यात प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र (Savani Ravindra) हिचा देखील समावेश होतो. सावनी रवींद्र हिने तिला मतदान करण्याची संधी न मिळाल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सावनीने सोशल मिडिया वर पोस्ट शेअर करत म्हणले आहे, ‘गेले अनेक दिवस सर्व ऑनलाईन पोर्टल वर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी. आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही.या बद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले’. याचबरोबर हे अत्यंत खेदजनक असल्याचे तिने सांगितले आहे. सावनीच्या पोस्टवर तिच्या फॉलोवर्सने प्रतिक्रिया देत विविध सल्ले दिले आहेत. एकाने सांगितले आहे की, मतदार यादी मतदानाच्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध होते, त्यात जर नाव आलं नाही तर आक्षेप घ्यावा लागतो. काही जणांनी वोटर्स हेल्पलाईन ऍपची मदत घ्यायला सांगितले. याचबरोबर हा प्रकार आपल्यासोबतही झाल्याचे काही युजर्सने सांगितले आहे.

हे ही वाचा:

४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाहीत, Mallikarjun Kharge यांचा दावा

loksabha election 4th phase voting: महाराष्ट्रात १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान,नंदुरबार मध्ये सर्वांधिक मतदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss