लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? Salman Khanच्या वडिलांना अज्ञात महिलेकडून धमकी

सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी मॉर्निग वॉकसाठी गेले असताना एका अज्ञात महिलेकडून ही धमकी देण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? Salman Khanच्या वडिलांना अज्ञात महिलेकडून धमकी

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) याना लॉरेन्स बिश्नोईं (Lawrence Bishnoi) च्या नावाने पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी मॉर्निग वॉकसाठी गेले असताना एका अज्ञात महिलेकडून ही धमकी देण्यात आली आहे. “लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?” असा प्रश्न विचारात सलीम खान यांना धमकवण्यात आले. याप्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात येणार असून परिसरातील नागरिकांची चौकशी करून माहिती घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सलमान खानचे वडील सलीम खान हे काल (दि. १८ सप्टेंबर) रोजी सकाळी ८.४५ च्या सुमारास बॅण्डस्टॅण्ड येथे मॉर्निग वॉकसाठी गेले होते. वॉक करता करता ते थकल्याने एका बिल्डिंगच्या समोर असलेल्या कट्ट्यावर बसले होते. तेवढ्यात गॅलेक्सी बिल्डिंग येथून बॅण्डस्टॅण्डच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक स्कुटी तिथे आली आणि त्यावर एक स्कुटीचालक आणि मागे एक बुरखाधारी महिला बसली होती. त्या दोघांनी यू टर्न मारला आणि ते सलीम खान यांच्याजवळ आले. स्कुटी थांबवून “लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?”असा प्रश्न त्यांनी धमकीच्या स्वराने विचारला आणि लगेच स्कुटी सुरु करून तिथून  निघून गेले. त्यांनी या स्कुटीचा नंबर पाहण्याचा प्रयत्न केला मात्र नंबर त्यांना पूर्ण दिसला नाही. पण त्यातील काही आकडे हे ७४४४ असे असल्याचे त्यांना दिसले. या सर्व प्रकरणानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलीस तपास करत असून त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.

याआधीही जून महिन्यामध्ये सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या घरी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरावर दोन तरुणांनी पहाटे गोळीबार केला होता, यामुळे मोठी खळबळ झाली होती. लॉरेन्स बिश्नोईंच्या भावानेच या गोळीबाराची सुपारी घेतली होती.

Gold Silver Rate Today : पितृपक्षातील या’ तिथीला सोने आणि चांदी खरेदी करणे मानले जाते शुभ त्याबद्दल माहिती आहे का तुम्हांला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version