spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘शाब्बास मिथू’ आज पासून सर्वत्र चित्रपटगृहात, मिताली राजच्या संघर्षाचा प्रवास

जागतिक पातळीवर भारतीय महिला क्रिकेट संघ देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम करत आहेत.

जागतिक पातळीवर भारतीय महिला क्रिकेट संघ देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम करत आहेत. भारतीय महिला राष्ट्रीय संघाची कर्णधार मिताली राज यांनी वेळोवेळी संघाच्या विजयासाठी पुढाकार घेतलेला आहे. मिताली यांनी केलेला संघर्ष तिचा आयुष्यातला खडतळ प्रवास एक उत्तम क्रिकेटर बनण्याची तिची ही वाटचाल ‘शाब्बास मिठू’ या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. सृजित मुखर्जी यांच्या दिग्दर्शनातून आणि अभिनेत्री तापसीच्या अभिनयातून हा चित्रपट साकारण्यात आलेला आहे.

‘शाब्बास मिठू’ हा चित्रपट आज सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आलेला आहे. मितालीचे लहानपण तिचा मित्र परिवार व तिची क्रिकेट शिकण्याची तीव्र इच्छा या गोष्टीवर आधारित हा चित्रपट आहे. शाब्बास मिठू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तापसी च्या अभिनयाचा सोशल मीडियावर नेटकरांनी कौतुक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viacom18 Studios (@viacom18studios)

 या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तापसीने माध्यमाची चर्चा केली. ती म्हणाली, “कोरोना नंतर माझा पहिला चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे उत्सुकते बरोबर मनामध्ये दडपण देखील आहे. काय होईल काय नाही होईल हे सांगता येणार नाही.  पुन्हा चित्रपटाने किती कमाई केली? त्याचबरोबर चित्रपट आणि बॉक्स ऑफिस मध्ये काय कामगिरी केली आहे. या सगळ्या गोष्टीची उत्सुकता आहे”. अशी भावना तापसी येणे व्यक्त केली.

हेही वाचा : 

नवी मुंबईत गुन्हे शाखाची मोठी कारवाई, 363 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Latest Posts

Don't Miss