Shah Rukh Khan : बॉलिवूडचा (Bollywood) किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) याची ईश्वरावरील श्रद्धा सर्वश्रुत आहे. अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून शाहरुख हा चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. पठाण चित्रपटाची शाहरुखचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. शाहरूख खानने नुकतीच मक्का येथील यात्रा केली. आणि आता हा चित्रपट रिलीज होण्याआधी शाहरुखनं वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. जम्मू- काश्मिरमधील वैष्णोदेवीच्या (Vaishno Devi) मंदिराच्या आवारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : Happy Birthday Rajinikanth सुपरस्टार ‘थलायवा’ यांचा आज ७२ वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्या जीवनाबद्दल
काही दिवसांपूर्वी शाहरुखनं सौदी अरेबियातील मक्का मशिदीला भेट दिली. तेथे त्यानं ‘उमराह’ हा हा विधी केला. मक्का मशिदीमधील शाहरुखचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आणि आता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा त्याच्या बॉडीगार्ड्ससोबत मंदिरात जाताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुखला बॉडीगार्ड्नं घेरले आहे. शाहरुख हा काळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसला. शाहरुखनं चेहरा पूर्ण झाकणारा मास्क होता, पण लाखो-करोडो चाहत्यांच्या नजरेतून सुटेल तो बादशाह कसला… वैष्णोदेवी मंदिरातील एशाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मास्क घालून गेलेल्या व्यक्तींमध्ये शाहरूख खानदेखील आहे, असा दावा करत तो वेगाने शेअर केला जातोय. शाहरूख खानने रविवारी रात्री वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेतल्याचं म्हटलं जातंय. त्याचं कारणही महत्त्वाचंच आहे. पुढच्या महिन्यात शाहरूख खानचा पठान हा चित्रपट प्रदर्शित होतोय. चित्रपट यशस्वी होऊ दे, अशी प्रार्थना त्याने वैष्णोदेवीला केली असणार. रविवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसमवेत शाहरूख खान कटारा येथे देवीच्या दर्शनासाठी गेल्याचं दिसून आलंय. सहजासहजी लोकांना ओळखू येऊ नये, असा पेहराव आणि मास्क घातला होता, असं म्हटलं जातंय.
SRK recently visited Mata Vaishnodevi to seek blessings.pic.twitter.com/Cr17b9N7gz
— Shah Rukh Khan Fc – Pune ( SRK Fc Pune ) (@SRKFC_PUNE) December 12, 2022
पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज
पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. पठाणमधील ‘बेशरम रंग’ हे गाणं आज रिलीज झालं आहे.
View this post on Instagram
शाहरुखचे आगामी चित्रपट
शाहरुख खान हा अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात शाहरुखनं एक छोटी भूमिका साकारली. तसेच ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच त्याचा ‘जवान’ हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हेही वाचा : Anil Deshmukh अनिल देशमुख यांना कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर