Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवसानिम्मित, ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan Birthday) याचा आज ५७ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे इथल्या निवासस्थानी म्हणजेच शाहरुख खानच्या 'मन्नत' घराबाहेर मध्यरात्री चाहत्यांची (फैन्स) तुफान गर्दी पाहायला मिळाली.

Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या वाढदिवसानिम्मित, ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

अभिनेता शाहरुख खान (Bollywood Actor Shah Rukh Khan Birthday) याचा आज ५७ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने वांद्रे इथल्या निवासस्थानी म्हणजेच शाहरुख खानच्या ‘मन्नत’ घराबाहेर मध्यरात्री चाहत्यांची (फैन्स) तुफान गर्दी पाहायला मिळाली. शाहरुख खान याच्या फॅन्स(चाहत्यांकडून) त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर वाढदिवस साजरा करण्यात आला.

गेली दोन वर्षे भारतात कोरोनाचे सावट असल्यामुळे शाहरुख खान याच्या चाहत्यांकडून वाढदिवस साजरा करता आला नव्हता. मात्र यावर्षी राज्यामधून कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्री त्याच्या घराबाहेर फॅन्सकडून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने फॅन्स एकत्र जमा झाले होते. तसेच शाहरुख खान याच्या ‘मन्नत’ घराबाहेर फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. यावेळी शाहरुख खान स्वतः घराच्या गेटवर येत सर्वांचे शुभेच्छा स्वीकार करत असल्याचं दिसला. तसेच शाहरुख खान आपल्या चाहत्याकडून शुभेच्छा स्वीकार करत असताना आपल्या मोबाईल मधून फॅन्ससोबत सेल्फी सुद्धा घेतली.

२ नोव्हेंबर म्हणजेच आज रोजी बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस आहे. २ नोव्हेंबर १९६५ रोजी दिल्लीत जन्मलेल्या शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवल्यानंतर चित्रपटांकडे वळला आणि रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट “दीवाना” होता. ‘डर’, ‘अंजाम’ आणि ‘बाजीगर’ सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या. ‘राजू बन गया जेंटलमन’ आणि ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘डुप्लिकेट’ किंवा ‘देवदास’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘चक दे’ सारख्या हलकेफुलक्या चित्रपटांमधून शाहरूख घराघरात पोहोचला. शाहरुख खानने ‘रईस’ आणि ‘डॉन’ सारख्या चित्रपटातही क्राइम गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

 ‘पठाण’चा टीझर होणार आऊट

शाहरुखच्या बहुचर्चित ‘पठाण’ या सिनेमाचा टीझरदेखील आज त्याच्या वाढदिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर २५ जानेवारी २०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात किंग खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

हे ही वाचा :

MIDC ने दिली महत्वाची माहिती; ठाकरे गटाच्या दिरंगाईमुळेच प्रकल्प…

Gas Cylinder Blast : दादरच्या छबीलदासमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट

जळगाव दूध संघाची निवडणूक जाहीर; कोण मारणार बाजी? खडसे की गिरीश महाजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version