spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

स्वतः शाहरुख खान याने मानले तरुणांचे आभार , पहा नेमकं काय झाले

बॉलीवूड बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटाची चर्चा ही चित्रपटाचे बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झाल्यापासूनच सुरु आहे. पठाणच्या या गाण्यामधील काही दृश्यांमुळे सगळीकडेच खळबळ माजली होती. पण लोकांचा आक्रोश बघता निर्मात्यांनी ही चित्रपटात आणि बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यामध्ये बद्दल करून घेतल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर काहींनी तर ॲडव्हान्स बुकिंग सुद्धा करून ठेवली आहे. तर काही शहरांमध्ये शाहरुख खानचे चाहते हे पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग केलं आहे. तर अश्याच प्रकारे सांगलीमधील शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी तर एका शोचं ॲडव्हान्स बुकिंग केलं आहे. मुख्य म्हणजे पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगलीमधील एसआरके युनिव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे.

यासंदर्भात एका ट्विटर अकाउंट मधून माहिती मिळाली आहे. एसआरके वासिम या नावाच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट शेअर केले गेले आहे. या ट्विटवर रिप्लाय चक्क शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) अधिकृत ट्विटर बितअकाउंट वरून देण्यात आला आहे. त्यात शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आभार मानले आहे. एसआरके वासिम या ट्विटर अकाउंटवरन केलेल्या ट्विट मध्ये तीन मुलं हातात पठाण चित्रपटाची तिकीटं घेऊन पठाणच्या पोस्टरसमोर उभे दिसत आहेत. या ट्वीटवर कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की , “सर, प्लिज हे पाहा, आम्ही पूर्ण ऑडिटोरियम बूक केलं आहे. पठाण चित्रपट बघण्यासाठी सांगली एसआरके युनिव्हर्स तयार आहे.” या ट्वीटला शाहरुख खान याने रिप्लाय देत लिहिले आहे की , “थँक्यू आणि तुम्हाला हा चित्रपट आवडेल, अशी आशा बाळगतो.”

बेशरम रंग (Besharam Rang) हे गाण प्रदर्शित झाल्यानंतर पठाण चित्रपटाच्या अडचणीत वाढ झाली होती. तर बॉयकोट पठाण हा ट्रेंड सुद्धा सुरु झाला होता. पण हा चित्रपट सगळ्या वादातून बाहेर पडला असावा असे दिसत आहे. कारण शाहरुखचे चाहते आता पठाणच्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ची जय्यत तयारी करत आहेत. SRK युनिव्हर्स हा शाहरुखचा फॅन क्लब भारतातील २०० हून अधिक शहरांमध्ये ‘पठाण’च्या फर्स्ट डे फर्स्ट शोचे आयोजन करतो आहे.

हे ही वाचा:

दैनिक ‘सामानाच्या’ जाहिरातीमधून शिंदे गटावर हल्लाबोल

वंचित आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss