ShahRukh Khan च्या हिरोईनचं दुसरं लग्न, बॉयफ्रेंड सलीमसोबत अडकली लग्नबंधनात; व्हिडिओ होतोय तुफान वायरल

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) रविवारी तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्न केले. रईसमध्ये (Raees) शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) दिसलेल्या या अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे.

ShahRukh Khan च्या हिरोईनचं दुसरं लग्न, बॉयफ्रेंड सलीमसोबत अडकली लग्नबंधनात; व्हिडिओ होतोय तुफान वायरल

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) रविवारी तिचा प्रियकर सलीम करीमसोबत लग्न केले. रईसमध्ये (Raees) शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) दिसलेल्या या अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. माहिराने लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी सलीम करीमसोबत पाच वर्षे डेट केले. सध्या ग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

माहिरा खानने तिच्या या लग्न सोहळ्यामध्ये हलका निळ्या रंगाचा लेहेंगा आणि चोली परिधान केला होती. ज्यावर तिने मॅचिंग लाँग चुनरी कॅरी केली होती. वधू बनलेली माहिरा खूपच सुंदर दिसत होती. तर सलीमने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती ज्यावर त्याने निळ्या रंगाची पगडी बांधली होती. दोघांची जोडी एकमेकांसोबत खूप छान दिसत होती. व्हिडिओमध्ये सलीम माहिराच्या डोक्यावरील ओढणी उचलताना आणि नंतर तिला मिठी मारताना दिसत आहे. या दरम्यान जोडप्याचे नातेवाईक आणि मित्र टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. माहिरा खानच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. लग्नाचा पहिला व्हिडिओ माहिराचे मॅनेजर अनुशय तलहा खान यांनी शेअर केला आहे.

माहिराने २०२० मध्ये एका संभाषणात पहिल्यांदा सलीमबद्दल खुलासा केला होता. समिना पिरजादासोबत रिवाइंड दरम्यान, माहिराने कबूल केले होते की ती सलीमला डेट करत आहे. तिने फॅशन मोगल हसन शहरयार यासिनसोबत इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान त्याच्याबद्दल बरेच तपशील शेअर केले होते. पाकिस्तानी आउटलेट डॉनच्या वृत्तानुसार, माहिरा म्हणाली, “हमसफरमध्ये एक ओळ आहे जी मला सुंदर वाटली, जिथे अशर खिरदला म्हणतो, ‘मला माहित नाही की तू मला काय दयाळूपणा दिला आहेस’ आणि मला तेच वाटते. त्याच्याबद्दलही.मला वाटतं, मी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं केलं असेल की देवानं त्याला माझ्याकडे पाठवलं.

माहिराचा पती सलीम करीम हा उद्योगपती आहे. ‘पब्लिशएक्स (सिमपैसा) या संस्थेचा तो सह-संस्थापक आहे. माहिरा आणि सलीम २०१७ मध्ये ‘टॅपमॅट’ नामक छोट्या पडद्यावरील कार्यक्रमादरम्यान पहिल्यांदा भेटले. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेकवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा: 

मराठा आरक्षणच्या मुद्यावरून मनोज जरांगे यांनी केली छगन भुजबळ यांच्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केले जनतेला आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version