शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन मुलीने उर्फ सना सईदने प्रियकराशी केला साखरपुडा, पहा प्रियकराने कसं केलं अभिनेत्रीला प्रपोज

हा व्हिडिओ पाहण्यासाठी सनाचे चाहते खूप उत्सुक आहेत आणि तिचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन मुलीने उर्फ सना सईदने प्रियकराशी केला साखरपुडा, पहा प्रियकराने कसं केलं अभिनेत्रीला प्रपोज

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील धाकटी अंजली म्हणून अभिनेत्री सना सईदला सर्वजण ओळखतात. या चित्रपटात शाहरुख खानच्या ऑन-स्क्रीन मुलीची भूमिका साकारणाऱ्या सनाने तिच्या प्रियकरासोबत साखरपुडा केला आहे. सनाने तिच्या सोशल अकाऊंटवर एक क्यूट व्हिडिओ शेअर करून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी सनाचे चाहते खूप उत्सुक आहेत आणि तिचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

नववर्षाच्या मुहूर्तावर सनाने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सनाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये सना आणि तिचा बॉयफ्रेंड ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. सनाकडे पाहून असे वाटते आहे की ती तिच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी खूप उत्सुक आहे.

सनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा प्रियकर गुडघ्यांवर बसून तिला प्रपोज करताना दिसत आहे. प्रियकराने प्रोपोज केल्यानांतर प्रथम सना आश्चर्यचकित झाल्याचे दिसत आहे, त्यानंतर ती या खास क्षणाचा आनंद घेताना दिसत आहे. सनाने व्हिडिओमध्ये अंगठी आणि प्रियकरासोबतचे तिचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. सनाने व्हिडिओसोबत हार्ट, रिंग आणि स्मायली फेस इमोजी शेअर केले आहेत. संपूर्ण व्हिडिओमध्ये सना आनंदाने नाचताना दिसत आहे.

सनाने तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत खास क्षण एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबत त्याने लिहिले की, हे वर्ष तिच्यासाठी खूप खास होते. सनाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यापासून तिचे चाहते आणि मित्र तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षांव करत आहेत.

हे ही वाचा:

नवे वर्ष,नवे नियम ! जाणून घ्या काय आहेत बदल आणि त्याने तुमच्या बजेटवर कसा होणार परिणाम

कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री गैरहजर राहण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version